Home Uncategorized पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी 

पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी 

2 second read
0
0
3

no images were found

पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी 

कोल्हापूर,  : कोल्हापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या पीएमई बस सेवेंतर्गत प्राप्त झालेल्या ४० नवीन बसेसपैकी १२ मीटर व ९ मीटर अशा दोन अत्याधुनिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसची प्रत्यक्ष रस्ता चाचणी आज यशस्वीरीत्या घेण्यात आली. महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या सूचनेनुसार ही चाचणी घेण्यात आली.
१२ मीटर बसची रस्ता चाचणी आर. के. नगर येथील स्वयंभू गणेश मंदिर ते कसबा बावडा या मार्गावर घेण्यात आली. तसेच ९ मीटर बसची चाचणी बोंद्रे नगर ते एस.टी. स्टँड, शाहू मैदान, राजारामपुरी मार्गे गंगावेश या मुख्य व अंतर्गत मार्गावर घेण्यात आली.
या प्रत्यक्ष चाचणी दरम्यान शहरातील विविध वाहतूक सिग्नल, संभाव्य वाहतूक कोंडीची ठिकाणे, बस थांब्यांवरील प्रवाशांचे चढणे-उतरणे, रस्त्यांची स्थिती तसेच स्पीड ब्रेकर्समुळे बसच्या संचालनावर होणारे परिणाम यांचा तांत्रिक व व्यावहारिकदृष्ट्या सखोल अभ्यास करण्यात आला. बसची शहरातील विविध मार्गांवर सुरक्षित, सुरळीत व प्रभावीपणे वाहतूक करण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींचे मूल्यमापन करण्यात आले.
या रस्ता चाचणीवेळी परिवहन सभापती श्री. सत्यजित जाधव व अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक श्री. संजय भोसले यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी केली. त्यांनी बसमधून प्रवास करून विविध मार्गांवरील वाहतूक संचालनाची पाहणी केली तसेच आवश्यक सूचना दिल्या.
कोल्हापूर शहरात दाखल झालेल्या या अत्याधुनिक व वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसमुळे शहरातील नागरिकांमध्ये पीएमई बस सेवेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. आजची रस्ता चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर व अधिकृत उद्घाटनानंतर या नवीन बससेवा लवकरच कोल्हापूरकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
यावेळी सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील, जेबीएमचे प्रतिनिधी सचिन साळुंखे, हंसा ऋषिकेश शिंदे, परिवहन विभागाचे चालक रविंद्र बोडके व नितीन ढेरे उपस्थित होते.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

मुंढवा येथील शासकीय जमीन कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा-हेमंत पाटील

मुंढवा येथील शासकीय जमीन कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा-हेमंत पाटील *खासदार पार्थ प…