
no images were found
पीटी उषा यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड
नवी दिल्ली : भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी भारताची दिग्गज धावपटू पी. टी. उषा यांची निवड निश्चित करण्यात आली आहे. या पदासाठी इतर कोणीही उमेदवारी दाखल केली नसल्यामुळे पी. टी. उषा यांची निवड जवळपास निश्चितच मानली जातेय. पीटी उषा यांनी २६ नोव्हेंबर (शनिवार) रोजी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. ही निवडणूक १० डिसेंबर ला होईल. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाच्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची काल रविवारी अंतिम मुदत होती. या पदासाठी इतर कोणी उमेदवारी दाखल केली नसल्यामुळे पी. टी. उषा यांची निवड जवळपास निश्चितच मानली जातेय.