Home सामाजिक भागीरथी संस्थेच्या महिला भगीनींनी बांधला पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना रक्षाबंधनाचा पवित्र धागा

भागीरथी संस्थेच्या महिला भगीनींनी बांधला पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना रक्षाबंधनाचा पवित्र धागा

13 second read
0
0
38

no images were found

भागीरथी संस्थेच्या महिला भगीनींनी बांधला पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना रक्षाबंधनाचा पवित्र धागा

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद घेऊन जनसेवा करणार्‍या पोलिसांना, नेहमीच सण समारंभाला मुकावे लागते. अशावेळी भागीरथी महिला संस्थेच्या वतीने, कोल्हापुरातील सर्वच पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना राखीचा पवित्र धागा बांधण्यात आला. त्यातून जनसेवेत २४ तास कार्यरत असणार्‍या पोलीस बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तर पोलीस दलाकडूनही या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
कोल्हापुरातील भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून सौ. अरुंधती महाडिक यांनी महिला सबलीकरणाचे सातत्यपूर्ण काम केले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही पोलिसांसाठी रक्षाबंधन हा उपक्रम राबवण्यात आला. भागीरथी संस्थेच्या सदस्यांनी पोलीस कर्मचार्‍यांना मनोभावे ओवाळून, त्यांना राखीच्या बंधनाचा अतूट धागा बांधला. यापुढेही पोलिस दलाकडून महिला भगीनींचे रक्षण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे, लक्ष्मीपुरीचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, शाहूपुरीचे निरीक्षक संतोष डोके, राजारामपुरीचे निरीक्षक विकास जाधव तसेच करवीरचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून, भागीरथी महिला संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्यात झालेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचार्‍यांना भागीरथी महिला संस्थेच्या रंजना शिर्के, अर्चना मोटे, पूजा संन्नके, रूपाली कुंभार, दीपा पाटील, राजेश्वरी मोटे, शारदा पोटे, सुप्रिया चौगुले यांनी राखी बांधली. तर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, उपनिरीक्षक खंडू गायकवाड, प्रमोद खाडे, मयुश्री खरात यांच्यासह हवालदार एकनाथ कळंत्रे, मंगेश माने, प्रीतम मिठारी, गजानन परीट अशा पोलीस कर्मचार्‍यांना राखी बांधण्यात आली. यावेळी शिवानी पाटील, जीविज्ञा क्षीरसागर, गायत्री फाले, राधिका पाटील, शरयू भोसले उपस्थित होत्या. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात निरीक्षक किरण लोंढे यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांना राखीचा धागा बांधण्यात आला. यावेळी ऐश्वर्या देसाई, राधा मेस्त्री, कल्याणी पवार मेढे, सपना मेथे, अनिता सावंत, अश्विनी मिठारी, सायली सावंत, नम्रता सुतार, नक्षत्र सणगरे, दिपाली बेलवलकर उपस्थित होत्या. तर राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक रुपेश इंगळे, मनोज कदम यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचार्‍यांना, भागीरथी संस्थेच्या छाया ननवरे, सीमा पालकर, चंद्रकला सिदनेर्ली, शुभांगी सूर्यवंशी, दीपिका राकुडे, शीतल ढेरे, गीता करंडे, उर्मिला मराठे, रिया सूर्यवंशी यांनी राखी बांधून औक्षण केले. गांधीनगर पोलिस ठाण्यातही आज रक्षाबंधन उपक्रम पार पडला. यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस सुलोचना नार्वेकर, अश्विनी जाधव, मीना गुरव, कोमल सुतार, उमा खांडेकर, अश्विनी पवार, सुनिता अनावर, सविता सुतार, पूजा कांबळे, विद्या पाटोळे, जयश्री तळसदे उपस्थित होत्या. तर करवीर पोलिस ठाण्यात भागीरथी महिला संस्थेच्या पुढाकारातून पोलीस रक्षाबंधन सोहळा पार पडला. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह कर्मचार्‍यांना भागीरथी संस्थेच्या सदस्यांनी राखी बांधली. यावेळी रोहिणी वाडकर, प्रियंका वाडकर, रंजना येडगे, सुजल निरगळ, सुनिता कोळी, आरती सांगवडेकर उपस्थित होत्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

चंद्रपूरच्या जंगलात’ चे आज शिवाजी विद्यापीठात अभिवाचन

चंद्रपूरच्या जंगलात’ चे आज शिवाजी विद्यापीठात अभिवाचन कोल्हापूर (प्रतिनिधी):-शिवाजी …