Home सामाजिक भागीरथी महिला संस्थेतर्फे कळंबा आणि बिंदू चौक कारागृहातील बंदीजनांसाठी राबवला रक्षाबंधन उपक्रम, भागीरथी संस्थेच्या उपक्रमाचे बंदीजनांकडून कौतुक

भागीरथी महिला संस्थेतर्फे कळंबा आणि बिंदू चौक कारागृहातील बंदीजनांसाठी राबवला रक्षाबंधन उपक्रम, भागीरथी संस्थेच्या उपक्रमाचे बंदीजनांकडून कौतुक

4 second read
0
0
47

no images were found

भागीरथी महिला संस्थेतर्फे कळंबा आणि बिंदू चौक कारागृहातील बंदीजनांसाठी राबवला रक्षाबंधन उपक्रम, भागीरथी संस्थेच्या उपक्रमाचे बंदीजनांकडून कौतुक

कोल्हापूर (प्रतिनिधी):-जाणते-अजाणतेपणी त्यांच्या हातून गुन्हा घडला. त्याची शिक्षा ते आज भोगत आहेत. कुटुंबांपासून ते दुरावले गेलेत. आज रक्षाबंधनानिमित्त त्यांना बहिणीची माया मिळावी, या उद्देशाने नुकतंच कळंबा आणि बिंदू चौक कारागृहात भागीरथी महिला संस्थेच्या वतीने रक्षाबंधन उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमाने कारागृहातील बंदीजनांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.
कोल्हापुरातील कळंबा आणि बिंदू चौक कारागृहात २ हजारपेक्षाही अधिक बंदीजन शिक्षा भोगत आहेत. कळत-नकळत हातून घडलेल्या गुन्ह्यामुळं ते कुटुंबीयांपासून दूर आहेत. सण-समारंभाचा आनंदही घेऊ न शकणार्‍या या बंदीजनांसाठी कळंबा आणि बिंदू चौक कारागृह प्रशासनाच्या पुढाकारातून भागीरथी महिला संस्थेच्यावतीने रक्षाबंधन उपक्रम घेण्यात आला. कारागृह अधीक्षक चंद्रकांत जठार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. अशा उपक्रमातून कारागृहात चांगल्या, सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते. भविष्यात देखील असे उपक्रम कारागृहात राबवण्याचा मानस कारागृह अधीक्षकांनी व्यक्त केला. भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी गेल्या १६ वर्षापासून राबवलेल्या उपक्रमांचे देखील त्यांनी कौतुक केले. त्यानंतर भागीरथी संस्थेच्या सदस्यांनी कारागृहातील बंदीजनांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली. तसेच बंदीजणांना भाऊ मानून त्यांना स्नेह बंधनात अडकवले. राखीचा पवित्र धागा बांधून त्यांनाही रक्षाबंधनाची अनुभूती दिली. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. बंदीजनांनी स्वतःच्या कुटुंबात आनंदी राहण्यासाठी इथून पुढे गुन्हेगारीचा मार्ग सोडावा, अशी विनंती संस्थेच्या सदस्यांनी व्यक्त केली. बंदीजनांनी या उपक्रमाबद्दल भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांचे आभार मानले. यावेळी धनंजय महाडिक युवाशक्तीचे सुनील वाडकर, नगरसेवक राजेंद्र गवळी, मयंक माने, बसवराज नाईक, शिवानी पाटील आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

बाळासाहेब बेलेकरानी उपस्थित केला सीपीआरच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!

 बाळासाहेब बेलेकरानी उपस्थित केला सीपीआरच्या कारभारावर प्रश्नचिन्ह! कोल्हापूर  (…