Home Uncategorized पुण्यात ‘पर्सनल आराम’ आणि कार्यक्षमतेला सौंदर्यात प्राधान्य

पुण्यात ‘पर्सनल आराम’ आणि कार्यक्षमतेला सौंदर्यात प्राधान्य

2 second read
0
0
13

no images were found

पुण्यात ‘पर्सनल आराम’ आणि कार्यक्षमतेला सौंदर्यात प्राधान्य

कोल्हापूर : पुण्यातील ग्राहक सौंदर्य उत्पादनांची निवड करताना वैयक्तिक आराम, कार्यक्षमता आणि जीवनशैलीला अधिक प्राधान्य देत असल्याचे फ्लिपकार्टच्या ब्युटी ट्रेंड्स रिपोर्टमधून समोर आले आहे. रिपोर्टनुसार, ७८ टक्के ग्राहक बाह्य निकषांपेक्षा वैयक्तिक पसंतीनुसार सौंदर्याची व्याख्या करतात.
पुण्यात वॉटरप्रूफ मेकअप उत्पादनांच्या शोधात वार्षिक तुलनेत १.५ पट वाढ झाली असून, मल्टी-फंक्शन फाउंडेशन, सन केअर आणि डर्मा स्किनकेअर उत्पादनांनाही पसंती मिळत आहे. पश्चिम भारतातील जेन झी ग्राहकांचा फ्लिपकार्टच्या ब्युटी व पर्सनल केअर श्रेणीतील वाटा सुमारे ६० टक्के असून, या विभागातील त्यांची खरेदी वार्षिक ५० टक्क्यांनी वाढली आहे.
या बदलत्या ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्टने पुण्यात ‘ग्लॅम अप फेस्ट २०२६’चे आयोजन केले आहे. या फेस्टमध्ये ५०० हून अधिक क्रिएटर्स, आघाडीचे ब्युटी ब्रँड्स, संगीत, नृत्य, गली रॅप, हिप-हॉप आणि ढोल-ताशांसह पुण्याच्या स्ट्रीट कल्चरचे सादरीकरण होणार आहे.
फ्लिपकार्टच्या ब्युटी आणि पर्सनल केअर विभागाचे प्रमुख कार्तिक कन्नमुरु म्हणाले, “पुण्यात सौंदर्य अधिक वैयक्तिक, व्यावहारिक आणि आत्मविश्वासावर आधारित होत आहे. ग्राहक आपल्या दिनचर्या, हवामान आणि जीवनशैलीशी सुसंगत उत्पादनांना पसंती देत आहेत.”
फेस्टमध्ये विविध क्रिएटर्ससह निव्हिया, व्हॅसलिन, बायोटिक, ॲक्वालॅजिका, बेला व्हिटा, ममाअर्थ आणि डॉ. सेठ्स यांसारखे ब्रँड सहभागी होणार आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

चंद्रपूरच्या जंगलात’ चे आज शिवाजी विद्यापीठात अभिवाचन

चंद्रपूरच्या जंगलात’ चे आज शिवाजी विद्यापीठात अभिवाचन कोल्हापूर (प्रतिनिधी):-शिवाजी …