no images were found
‘ २० व २१ जानेवारी रोजी कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन
कोल्हापूर/प्रतिनिधी: निसर्गात कंदमुळे देणाऱ्या अनेक वनस्पती आहेत. अनेक कंदमुळांच्या वनस्पती ह्या रानावनात, जंगलात वाढतात अशा रानकंद वनस्पर्तीबाबतचे पारंपरिक ज्ञान वनवासी, आदिवासी आणि कोकणवासीयांच्याकडे आहे. अशाप्रकारच्या विविध रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती शहरवासियांना आणि खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना व्हावी, शेतकऱ्यांनी त्यांची लागवड त्यांच्या शेतात करण्याच्या हेतूने “निसर्गअंकुर ‘हयांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वुई केअर आणि एनजीओ कम्पॅशन २४ ह्या संस्थेच्या आयोजनातून तसेच श्री. शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन क्लब कोल्हापूर, युथ ऍनेक्स, इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूर मिलेनिअल्स, रोटरॅक्ट – कोल्हापूर झोन ह्या संस्थांच्या सहकार्याने शनिवारी आणि रविवारी दिनांक २० आणि २१ जानेवारी २०२४ रोजी ७० हून अधिक कंदमुळांचे आणि १६० हुन अधिक औषधी वनस्पतींचे माहितीपूर्ण प्रदर्शन शहाजी कॉलेज, दसरा चौक येथे आयोजित करण्यात आले आहे.
ह्या प्रदर्शनाचे उदघाटन प्रमुख पाहुणे खासदार धनंजय महाडिक आणि डॉ. वी. एन. शिंदे, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या हस्ते होणार असून महेंद्र पंडीत, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, संजय शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी, कोल्हापूर, बाबासाहेब वाघमोडे, प्रांताधिकारी, गडहिंग्लज डॉ. डी. आर. मोरे, माजी प्रभारी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, ह्यांच्या विशेष उपस्थितीत हा प्रदर्शनाचा सोहळा पार पडणार आहे. अशी माहिती एनजीओ कम्पेंशन २४, कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष
मिलिंद धोंड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
अगदी पुरातन पौराणिक काळापासून मानव कंदमुळांचा अन्न म्हणून वापर करत आला आहे. शतावरी, अमरकंद, सफेद मुसळी, पेनवा इत्यादी वनस्पतींच्या कंदाचा औषधात वापर करतात. गाजर, मुळा, बीट, आले, हळद, कांदा, लसूण इत्यादी वनस्पतींच्या कंदाचा आपण आपल्या आहारात वापर करतो. अळू, कमळं, सुरण हे कंदही भाजीसाठी वापरतात. साबुकंदापासून साबुदाणा तयार करतात. मानवी आहारात उपयुक्त असणाऱ्या अशा बहुतांश कंदवर्गीय वनस्पतींची शेतात लागवड केली जाते.
ह्या प्रदर्शनात सताप, गुगुळ, कुसर, कोष्ट कोलीजन, लक्ष्मी तरु, सागर गोटा, बेडकी पाला, अक्कल कारा, दमवेल, काजरा ह्या दुर्मिळ अश्या औषधी वनस्पती तसेच कणगा, काटे कणग, कोराडू, करांदा, वराहकंद, वासकंद, पासपोळी, शेंडवेल, आळसी, शेवळा, सुरण ह्या वनस्पतींची कंदमुळे, कंदीका आणि कंदक तसेच मोठा कासार अळू, काळा अळू, हिरवा अळू, पांढरा पेरव, उंडे, शेडवाळे असे अकुंचे विविध प्रकार आणि त्यांचे कंद, त्याचबरोबर काळी हळद, आआंबेहळद ह्या सारखे हळदीचे विविध प्रकार व त्यांचे कंद इ. अशाप्रकारच्या सुमारे ७० हुन अधिक प्रकारच्या कंदाच्या जाती प्रजातींची मांडणी ह्या प्रदर्शनात केली जाणार आहे अशी माहिती निसर्गअंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर यांनी दिली.
एकूण ७० कंदांच्या प्रकारांपैकी १५ ते २० प्रकारचे कंद विक्रीसाठी उप्लब्ध असून सुमारे ६ ते ७ प्रकारच्या कंदांच्या पाककृती बाबतची माहितीही सर्व उपस्थितांना ह्या प्रदर्शनात दिली जाणार आहे. ह्या वेळी हौशी खवय्यांना कंदांपासून तयार केलेल्या विविध पदार्थाची चवही चाखता येणार आहे.
प्रदर्शनात ठेवण्यात येणाऱ्या कंदांचे संकलन प्रामुख्याने कर्नाटकातील जोयडा, महाराष्ट्रातील बेल्हे (पुणे) व गगनबावडा (कोल्हापूर) आणि एका भागातून करण्यात येणार आहे.
“लेट्स गेट बैंक टु अवर रूट्स “हया ब्रीदवाक्याचा अंगिकार करून आपल्या मातीत वाढणाऱ्या
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणान्या आरोग्यवर्धक कंदमुळांची माहिती घेऊन चौकस आहारातून सुदृढ़ पिढी घडवण्यासाठी विद्यार्थी, आबालवृद्ध तसेच सर्व नागरिकांनी एकमेव वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा असे आवाहन मिलिंद धोंड ह्यांनी केले आहे.
चैनल 8 हे ह्या प्रदर्शनाचे मौडिया पार्टनर असून गार्डन क्लब कोल्हापूर, रोटरॅक्ट कोल्हापूर झोन, सौ. मंजिरी कपडेकर कूर्कीग क्लासेस, इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूर मिलेनिअल्स, युथ एनेक्स आणि बुई केजर हेल्पलाईन ह्या संस्थांच्या मोलाच्या सहकार्याने हे प्रदर्शन पार पडणार आहे.
हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामूल्य आहे. २० जानेवारी रोजी सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.२१ जानेवारी २०२ ४ सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत खुले राहणार आहे.
पत्रकार परिषदेस मिलींद धोंड, निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक वाली, प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्क्ळकी, को चेअरमन अमृता वासुदेवन,
गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी मंजिरी कपडेकर, सुशिल रायगांधी, अभिजीत पाटील, आरती रायगांधी उपस्थित होते.