no images were found
कलाकार शेअर करत आहेत त्या आठवणी आणि भावना ज्या रक्षाबंधनला खास बनवतात
मुंबई, : रक्षाबंधन हा भाऊबहिणींच्या खास नात्याचा उत्सव आहे, जो अनेक वर्षांच्या आठवणी, प्रेम, हशा आणि नेहमी एकमेकांसोबत राहण्याच्या वचनावर आधारलेला आहे. काळानुसार परंपरा आणि साजरे करण्याच्या पद्धती बदलू शकतात, पण या सणामागील भावना मात्र कायम तशाच राहतात. या रक्षाबंधनानिमित्त सोनी सबचे कलाकार तोरल रसपुत्रा, समरिध बावा, इकबाल खान, नितिन बाबू, मनीष वाधवा आणि मुस्कान बामने यांनी त्यांच्या भावंडांशी असलेल्या नात्याला खऱ्या अर्थाने खास बनवणाऱ्या आठवणी आणि अनुभव शेअर केले आहेत.
इकबाल खान, जो यादें मध्ये डॉ. देव मेहता यांची भूमिका साकारतो, यांनी सांगितले, “माझ्या बहिणी माझ्यासाठी नेहमीच खूप महत्त्वाच्या राहिल्या आहेत आणि रक्षाबंधन मला त्या नात्याच्या असंख्य आठवणी परत आणून देतो. माझ्या आयुष्यातील एक खास रक्षाबंधन परंपरा माझ्या शालेय जीवनाशी जोडलेली आहे. माझ्या थिएटर शिक्षिका श्रीमती अरुणा आहुलावालिया यांची मुलगी किस्मत आहुलावालिया माझ्या शाळेत सिनियर होती. ती मला अनेक वर्षांपासून रक्षाबंधन पाठवत आहे आणि जरी ती हाँगकाँगमध्ये राहते तरीही दरवर्षी ते मला वेळेवर मिळते आणि मी ती सर्व राख्या जपून ठेवली आहेत. ही एक सुंदर परंपरा आहे जी तिने जिवंत ठेवली आहे आणि तिच्यामागील भावनांना मी खरोखरच जपतो.”
तोरल रसपुत्रा, जी हस्तिनापुर के वीर मध्ये कुंतीची भूमिका साकारते, यांनी सांगितले, “राखी किंवा भेटवस्तूपेक्षा मला त्यामागील भावना अधिक प्रिय आहेत. त्याला फारसा भौतिक मूल्य नसेल कदाचित, पण त्यात बालपणाच्या असंख्य आठवणी दडलेल्या आहेत जेव्हा हातावर बांधलेला साधा धागा हा प्रेम, काळजी आणि नेहमी सोबत राहण्याच्या वचनाचा प्रतीक वाटायचा. माझ्या भावाने दिलेली प्रत्येक भेट माझ्यासाठी खूप खास आहे. त्याने दिलेली एक नेकलेस मी आजही घालते. माझ्यासाठी ती आठवण आहे की भावंडांचे नाते वेळेसोबत अधिकच मजबूत होत जाते.”
समरिध बावा, जो पुष्पा इम्पॉसिबल मध्ये अश्विनची भूमिका साकारतो, यांनी सांगितले, “मी वेगळ्या शहरात राहतो म्हणून माझ्या बहिणी नेहमी खात्री करतात की मी रक्षाबंधन चुकवू नये आणि त्या मला टपालाने राख्या पाठवतात. त्या दिवशी मी साधारणपणे माझ्या एखाद्या मित्राला ती माझ्या मनगटावर बांधायला सांगतो, आणि माझ्या बहिणी मात्र खात्री करतात की मी त्यांना लंच किंवा डिनरला घेऊन जावं! जरी आम्ही वेगवेगळ्या शहरांतून साजरा करत असलो तरी त्या नेहमी हा दिवस खास बनवण्याचा मार्ग शोधतात.”
नितिन बाबू, जो पुष्पा इम्पॉसिबल मध्ये चिरागची भूमिका साकारतो, यांनी सांगितले, “माझ्यासाठी राखी कधीच फक्त एक धागा किंवा भेटवस्तू नसते, ती अनेक वर्षांच्या आठवणी, प्रेम आणि नेहमी एकमेकांसोबत राहण्याच्या न बोललेल्या वचनाचं प्रतीक असते. मी अजूनही माझ्या भावंडांकडून मिळालेल्या छोट्या भेटवस्तू आणि राख्या जपून ठेवतो, विशेषतः बालपणातील, कारण त्या मला एका साध्या आणि निरागस काळात परत नेतात. माझ्या बहिणीने मला एक सुंदर जॅकेट दिलं आहे, जे मला खूप आवडतं. वेळ जसजसा पुढे जातो तसतशी भेटवस्तू जुनी होतात किंवा बदलल्या जातात, पण त्यामागील भावना मात्र अधिक मौल्यवान होत जातात. हाच रक्षाबंधनाचा खरा अर्थ आहे जीवन कितीही बदललं किंवा आपण कितीही दूर गेलो तरी काही नाती नेहमी घरासारखीच राहतात.”
मनीष वाधवा, जो हस्तिनापुर के वीर मध्ये भीष्म पितामहाची भूमिका साकारतो, यांनी सांगितले, “माझ“माझ्यासाठी रक्षाबंधन हा नेहमीच विधीपेक्षा नात्याचा उत्सव राहिला आहे. लहानपणी माझी भावंडं आणि मी हा सण खूप उत्साहाने साजरा करायचो, आणि त्या साध्या बालपणीच्या आठवणी आजही माझ्या मनाजवळ आहेत. माझ्या बहिणीने एकदा हाताने बनवलेली राखी बांधली होती आणि ती मी अजूनही जपून ठेवली आहे. आज जीवन व्यस्त असलं तरी आणि आम्ही नेहमी एकत्र नसतो तरीही ते प्रेम तसंच आहे. दरवर्षी आमच्याकडे एक खास परंपरा आहे मी ‘गोलगप्पे वाला भैया’ असतो आणि माझ्या बहिणीसाठी व संपूर्ण कुटुंबासाठी चाट बनवतो. मला वाटतं, भावंडं असण्याचं हेच सौंदर्य आहे वय वाढतं पण ती जवळीक आणि तो आपुलकीचा भाव कधीच बदलत नाही.”
मुस्कान बामने, जी पुष्पा इम्पॉसिबल मध्ये शनायाची भूमिका साकारते, यांनी सांगितले, “मला वाटतं भावंडं असण्याचा सगळ्यात सुंदर भाग म्हणजे ते तुम्हाला अशा पद्धतीने ओळखतात जशी कुणीच ओळखू शकत नाही. एका क्षणी छोट्याछोट्या गोष्टींवर भांडण होतं आणि पुढच्या क्षणी एकमेकांसाठी उभं राहतो. रक्षाबंधन नेहमी मला त्या लहानशा क्षणांची आठवण करून देतो छेडछाड, वाद आणि आपण एकत्र वाढवलेल्या आठवणी. मला पेंटिंगची खूप आवड असल्यामुळे माझा भाऊ मला नेहमी छान स्टेशनरी आणून देतो रंगीत पेन, मार्कर्स आणि हायलाइटर्स. वय वाढलं तरीही ती समीकरणं तशीच राहतात आणि हाच भावंडांच्या नात्याचा खासपणा आहे.”