no images were found
सरनोबतवाडी, शाहू व शिरोली टोल नाक्यांवरील जुने स्ट्रक्चर हटविण्याची कार्यवाही सुरु
कोल्हापूर,: कोल्हापूर शहर रस्ते विकास प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या शिरोली, सरनोबतवाडी व शाहू टोल नाक्यांवरील जुने केबीन व स्ट्रक्चर हटविण्याची कार्यवाही कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. आय.आर.बी. कंपनीमार्फत उभारण्यात आलेले हे टोल नाके व शेड जुने झाल्याने त्यांचे निष्कासन करण्याचा निर्णय महापालिकेच्यावतीने घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या वतीने ठेकेदारामार्फत ही कार्यवाही करण्यात येत असून आर.ए. स्क्रॅप ॲन्ड बिल्डिंग डिमॉलेशन या संस्थेकडून प्रत्यक्ष काम सुरू आहे. सरनोबतवाडी टोल नाका येथील केबीन व स्ट्रक्चर निष्कासित करण्याचे काम गेल्या चार दिवसांपासून सुरू होते. हे काम पूर्ण झाले असून आजपासून शाहू टोल नाका येथील जुने केबीन व स्ट्रक्चर हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
शाहू टोल नाका येथील काम पूर्ण झाल्यानंतर शिरोली टोल नाका येथील जुने केबीन व स्ट्रक्चर निष्कासित करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने करण्यात येणाऱ्या या कार्यवाहीमुळे टोल नाक्यांवरील कालबाह्य व धोकादायक स्ट्रक्चर हटवून परिसर अधिक सुरक्षित व सुटसुटीत होणार आहे.