Home Uncategorized न्यू कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासदौरा संपन्न.

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासदौरा संपन्न.

0 second read
0
0
15

no images were found

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासदौरा संपन्न.

कोल्हापूर (प्रतिनिधी):-श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित, न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उंचगाव कोल्हापूर येथील डी.फार्मसी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थांनी सिध्द‌गिरी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर कणेरी, कोल्हापूर येथील रुग्णालयांला भेट देऊन रुग्णालयात कशा पद्धतीने काम केले जाते याबाबत माहिती जाणून घेतली.पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना रुग्णालयातील कामकाजाविषयी ज्ञान मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. डी.फार्मसीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी हे रोजगाराच्या दृष्टीने ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, खाजगी रुग्णालयात औषधनिर्माण अधिकारी (फार्मासिस्ट) म्हणून कार्यरत होतात. त्यावेळी त्यांना अडचणी यायला नको व काम कसे करावे तसेच विभागनिहाय कामाचे स्वरूप कसे असते आदी विषयांना लक्षात घेऊन सिध्द‌गिरी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर कणेरी, कोल्हापूर येथे भेट दिली. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सौ.प्रियांका चौगुले व श्री रंगराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच दत्तकला मेडिकल मणेरमळा, उंचगाव, कोल्हापूर येथे मेडीकल स्टोअर ला भेट दिली या भेटीद्‌वारे श्री सुशांत यादव यांनी विद्यार्थ्यांना हॉस्पिटल फार्मसी प्रॅक्टिस, पेशंट केअर सिस्टिम, क्लिनिकल मॅनेजमेंट तसेच मेडीकल सर्व्हिसेस व फार्मसी ऑपरेशन्स यांची प्रत्यक्ष माहिती दिली. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. सदरचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.रितुराज देसाई, प्रा.वैशाली यादव, प्रा.काजल मोहिते, प्रा.साक्षी माने, प्रा.अंजली महाडिक व प्रा.धनश्री रावल यांनी विशेष परिश्रम घेतले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

गुलकी जोशी दिसणार पारंपरिक महाराष्ट्रीयन अवतारात

गुलकी जोशी दिसणार पारंपरिक महाराष्ट्रीयन अवतारात सोनी सबचं यादें आपल्या अनो…