Home Uncategorized पत्रकारितेमुळे अनोळखी जग पाहायला मिळाले : ओलवे

पत्रकारितेमुळे अनोळखी जग पाहायला मिळाले : ओलवे

1 second read
0
0
9

no images were found

पत्रकारितेमुळे अनोळखी जग पाहायला मिळाले : ओलवे

कोल्हापूर, : पत्रकारितेमुळे जे जग कधी पाहिले नव्हते, असे अनोळखी जग पाहायला मिळाले, असे प्रतिपादन ‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त छायाचित्रकार सुधारक ओलवे यांनी केले. ते जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ‘साहित्य आणि ललित कला’ या विषयावर मराठी विभागात बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे होते, तर प्रमुख उपस्थितीत डॉ. नंदकुमार मोरे होते.

यावेळी ओलवे म्हणाले, भौतिक जगाच्या पलीकडचे आणखी एक जग आपल्या आवतीभोवती वावरत असते. त्याकडे डोळेझाकपणा करणे म्हणजे आपणच आपल्याशी प्रतारणा करण्यासारखे असते. त्या जगाकडे डोळसपणे पाहण्याच्या आंतरिक गरजेतून मी छायाचित्रणाकडे वळलो. म्हणून माणूस हा माझ्या छायाचित्रणाचा केंद्रबिंदू आहे. त्यासाठी माणसाच्या डोळ्यात बघितले की, कोणत्याही परवानगीची गरज लागत नाही. यातूनच दीर्घकाळ टिकणारे काम करण्याची ऊर्मी मिळाली.

अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. शिंदे म्हणाले, रूढ छायाचित्रांपेक्षा ओलवे यांची चित्रणाची पद्धत अनवट आहे. त्यांनी ज्या जगाकडे लक्ष वेधले आहे; त्यामधून अधोविश्वाचे, श्रमकरी जगाचे, असहाय्य स्त्रीविश्वाचे दर्शन घडते. त्यांच्या सबंध छायाचित्र मालिकांमधून व्यापक करुणाभाव स्रवत राहतो.

यावेळी ओलवे यांनी निवडक छायाचित्रांमागील पार्श्वभूमी सांगून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे समाधान केले. यावेळी सुभाष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास डॉ. धनंजय देवळालकर, सोनाली जाधव, अवधूत गंगाधर व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. ज्योती वराळे यांनी सूत्रसंचालन केले. अमोल देशमुख यांनी आभार मानले. 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

१९४ वर्षांच्या वारशाला नवी दिशा देणाऱ्या सहाव्या पिढीतील उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास

१९४ वर्षांच्या वारशाला नवी दिशा देणाऱ्या सहाव्या पिढीतील उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास पुण…