Home Uncategorized १९४ वर्षांच्या वारशाला नवी दिशा देणाऱ्या सहाव्या पिढीतील उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास

१९४ वर्षांच्या वारशाला नवी दिशा देणाऱ्या सहाव्या पिढीतील उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास

29 second read
0
0
37

no images were found

१९४ वर्षांच्या वारशाला नवी दिशा देणाऱ्या सहाव्या पिढीतील उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास

पुणे,: भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित सराफी व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’चा वारसा वयाच्या मध्यतिशीत स्वीकारलेल्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव, संघर्ष, निर्णय आणि नेतृत्वाचा प्रवास शब्दबद्ध केला आहे. त्यांचे आत्मचरित्र ‘चूजिंग गोल्ड‘ हे पेंग्विन रँडम हाऊस इंडिया यांनी राष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केले आहे.

    ‘चूजिंग गोल्ड‘ हे अत्यंत प्रामाणिक आणि वैयक्तिक अनुभवांवर आधारित असे पुस्तक आहे. भारतातील सर्वात जुन्या व्यावसायिक वारशांपैकी एकाचा वारसा तरुण वयात स्वीकारल्यानंतर, आज वयाच्या एकोणपन्नाशीत डॉ. सौरभ गाडगीळ यांनी आपल्या आयुष्याच्या प्रवासाकडे मागे वळून पाहत त्यातील अनुभव, संघर्ष, निर्णय आणि शिकवणी यांचा प्रांजळ वेध घेतला आहे. हा प्रवास बाहेरच्या जगाला दिसणाऱ्या यशाचा नसून, त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या वास्तवाचा आणि त्यातून घडलेल्या व्यक्तिमत्त्वाचा आहे.

      या आत्मचरित्रात डॉ. सौरभ गाडगीळ यांच्या आयुष्याला आकार देणारे अनेक महत्त्वाचे क्षण, आजोबा आणि आई यांच्यासोबतचे आयुष्यभर स्मरणात राहिलेले संवाद, काळाच्या ओघात उमगलेल्या गोष्टी तसेच त्यांच्या विश्वास, धैर्य आणि मूल्यांची कसोटी पाहणारे अनेक कठीण निर्णय यांचा प्रामाणिक वेध घेण्यात आला आहे. १९४ वर्षांच्या पीएनजी ज्वेलर्सच्या समृद्ध वारशाची पार्श्वभूमी या कथेला लाभली असली, तरी या पुस्तकाचा केंद्रबिंदू हा स्वतः डॉ. गाडगीळ यांचा व्यक्तिमत्त्व विकास, त्यांचा संघर्ष, त्यांनी घेतलेले निर्णय आणि परंपरेचा सन्मान राखत स्वतःचा स्वतंत्र मार्ग घडवण्याचा प्रेरणादायी प्रवास हा आहे.

    पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, “आयुष्य जगताना स्वतःसाठी जो वेळ मिळतो, ज्यात आपण मागे वळून पाहतो, तशी संधी मला कधी मिळाली नाही. या पुस्तकाच्या निमित्तानं पहिल्यांदाच ही संधी मिळाली. स्वतःशी संवाद साधत अनेक प्रश्नांना या निमित्तानं मला सामोरं जाता आलं. आजपर्यंत मी घेतलेल्या कोणत्या निर्णयांचा मला खऱ्या अर्थानं अभिमान आहे? कोणत्या निर्णयाबाबत आजही मनात सल आहे, कोणते निर्णय अनुभवाच्या जोरावर योग्य ठरले आणि कोणते केवळ नशिबाच्या साथीनं योग्य ठरले. या सगळ्या मला पडलेल्या प्रश्नांना मी दिलेलं प्रामाणिक उत्तर म्हणजे ‘चूजिंग गोल्ड‘ हे पुस्तक. त्यात कोणताही आडपडदा नाही किंवा यशानंतर निर्माण होणाऱ्या परिपूर्णतेचा कोणता आवही नाही

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर व रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन

सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर व रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन कोल्हाप…