Home गौरव सन्मान साहित्य, संस्कृती, कला आणि क्रीडा हे घटक उदरनिर्वाहासाठी उपयुक्त- कुलसचिव डॉ.विलास शिंदे

साहित्य, संस्कृती, कला आणि क्रीडा हे घटक उदरनिर्वाहासाठी उपयुक्त- कुलसचिव डॉ.विलास शिंदे

2 second read
0
0
5

no images were found

साहित्य, संस्कृती, कला आणि क्रीडा हे घटक उदरनिर्वाहासाठी उपयुक्त- कुलसचिव डॉ.विलास शिंदे

कोल्हापूर,:- साहित्य, संस्कृती, कला आणि क्रीडा हे सगळे घटक उदरनिर्वाहासाठी उपयुक्त आहेत. प्रत्यक्षात कौशल्य संपादन केल्यास निश्चित उज्वल भविष्य आहे. याकरिता शास्त्रशुध्द माहिती असणे खूप गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी आज येथे केले.
विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभाग आणि संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील सांस्कृतीक समन्वयकांना कलाप्रकारांची शास्त्रोक्त माहिती होण्यासाठी राजर्षी शाहू सभागृहामध्ये दोन दिवसीय ‘लोककला आणि लोकनृत्य माहिती कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यशाळेच्या उद्धाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुलसचिव डॉ.विलास शिंदे बोलत होते.
कुलसचिव डॉ.शिंदे पुढे म्हणाले, पारंपरिक लोककला व लोकनृत्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्याचबरोबर समाजातील प्रत्येक माणसापर्यंत पोहचविण्यासाठी विद्यापीठ विविध माध्यमातून प्रयत्न करीत आहे. बदल हा सातत्याने स्विकारला पाहिजे. तरच, माणूस तरूण, दीर्घायुषी आणि निरामय जीवन जगू शकतो. कार्यशाळेमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून अचूक तंत्र, नवीन पिढीमध्ये कला संस्कृतीची आवड निर्माण करणे, लोककलेचा वारसा आणि त्यामागील सामाजिक पार्श्वभूमीची माहिती उपलब्ध होणार आहे.
तद्नंतर, प्रथम सत्रामध्ये राजेश पंचे, सोलापूर यांनी तर द्वीतीय सत्रामध्ये संदीप पाटील, मुंबई यांनी मार्गदर्शन केले. उद्या, तृतीय सत्रामध्ये रामानंद उगले, जालना आणि कल्याण उगले, जालना तर चतुर्थ सत्रामध्ये डॉ.गणेश चंदनशिवे, मंुबई हे मार्गदर्शन करणार आहे.
विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सावळीराम घाणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ.प्रमोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संगीत व नाटयशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.विनोद ठाकूर-देसाई यांनी आभार मानले. यावेळी डॉ.नंदकुमार मोरे, डॉ.शंतनु पाटील, डॉ.श्रीमती एम.बी.पोतदार यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हयातील महाविद्यालयांमधील सांस्कृतिक समन्वयक, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In गौरव सन्मान
Comments are closed.

Check Also

पत्रकारितेमुळे अनोळखी जग पाहायला मिळाले : ओलवे

पत्रकारितेमुळे अनोळखी जग पाहायला मिळाले : ओलवे कोल्हापूर, : पत्रकारितेमुळे जे जग कधी पाहिल…