Home Uncategorized निवडणूक भत्त्यापोटी 700 अधिकारी-कर्मचाऱ्यांना 1 कोटी 85 लाखांचा निधी मंजूर

निवडणूक भत्त्यापोटी 700 अधिकारी-कर्मचाऱ्यांना 1 कोटी 85 लाखांचा निधी मंजूर

12 second read
0
0
6

no images were found

निवडणूक भत्त्यापोटी 700 अधिकारी-कर्मचाऱ्यांना 1 कोटी 85 लाखांचा निधी मंजूर

कोल्हापूर,  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अंतर्गत निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सुमारे 700 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निवडणूक भत्ता मंजूर करण्यात आला आहे. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज या भत्त्यास मंजुरी दिली.

            यामध्ये राजपत्रित अधिकारी, मुख्य निवडणूक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 1 ते 7 यांच्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच वाहनचालकांचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रियेतील विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदर भत्ता देण्यात येणार आहे. या निवडणूक भत्त्यासाठी 1 कोटी 85 लाख रुपयांची रक्कम महापालिकेच्या स्वनिधीतून उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मंजुरी दिलेले आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्त्याची रक्कम अदा करण्याची पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. महापालिकेने यापुर्वी निवडणूक केंद्रावर काम करणा-या व मतमोजणी करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना यापुर्वी भत्ता अदा केला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

एचडीएफसी बँकने ‘विजिल आंटी सेज – लेझिनेस सेव्हज’, हा फसवणूक जागरूकता अभियान सुरू केला आहे

एचडीएफसी बँकने ‘विजिल आंटी सेज – लेझिनेस सेव्हज’, हा फसवणूक जागरूकता अभियान सुरू केल…