no images were found
परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींवर कोल्हापुरात मोफत मार्गदर्शन सेमिनार
कोल्हापूर,:- परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट स्टडीतर्फे परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी या विषयावर मोफत मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आला आहे.सेमिनार शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता हॉटेल वृषाली येथे होणार आहे.
सेमिनारमध्ये परदेशातील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया, विविध अभ्यासक्रम, देशांची निवड, शिष्यवृत्ती, करिअरच्या संधी, पार्टटाइम जॉब्स आणि निवास व्यवस्था याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
विविध देशांमधील उच्च शिक्षणाच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. सेमिनारसाठी प्रवेश विनामूल्य असून जागा मर्यादित आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठी 95132 38188 या क्रमांकावर संपर्क साधावा. अथवा स्मार्ट स्टडी कार्यालय, विवेकानंद कॉलेजसमोर, नागाळा पार्क येथे संपर्क साधावा.