Home Uncategorized आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णी

आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णी

0 second read
0
0
6

no images were found

आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णी

नीट पेपर फुटी प्रकरणाचा वाद अधिक चिघळत चालला आहे. कॉकरोच जनता पार्टीकडून जंतर मंतर येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला केवळ भारतातातून नाही तर, परदेशातूनही पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक दिग्गज कलकारांनी थेट मैदान गाठले. काहींनी सोशल मीडियात पोस्ट शेअर करुन पाठिंबा दर्शवला. अलिकडेच सलमान खानने पोस्ट शेअर करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. दरम्यान , नुकतंच दिग्गज अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अतुल कुलकर्णी यांनी सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर करुन पाठिंबा दिला आहे. सध्या त्यांनी शेअर केलेली पोस्टही व्हायरल होत आहे.
अतुल कुलकर्णी कायम आपल्या सामाजात नेमकं काय घडतंय, हे पाहून मत मांडतात. अलिकडेच देशभरात सुरु असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी ही पोस्ट आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर शेअर केली आहे. अतुल कुलकर्णींनी या पोस्टच्या माध्यमातून आपल्या देशातील युवकांना एक संदेश दिला आहे. अतुल कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? पाहूयात.
अतुल कुलकर्णींची फेसबुक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल, ‘या चळवळीच्या माध्यमातून, आजच्या पिढीने गांधी आणि आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केलाय…माझ्या पिढीने आणि आमच्या आधीच्या आणि नंतरच्या पिढ्यांनी सातत्याने त्यांची नावे घेतली आहेत, आम्ही आमच्या कृतींमधून त्यांचे विचार जवळजवळ पूर्णपणे पुसून टाकले होते. प्रत्येक क्षेत्रात: शिक्षण, सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय; सर्वच क्षेत्रांमध्ये. सध्याच्या परिस्थितीसाठी आपण जबाबदार आहोत. आता आपण किमान हे तरी केले पाहिजे; जागे व्हा, जबाबदारी घ्या आणि या तरुणांना पाठिंबा द्या’.
सध्या अतुल कुलकर्णी यांची पोस्ट व्हायरल होत आहे. अतुल कुलकर्णी यांच्या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, अतुल कुलकर्णी यांनी उघडपणे सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान, आता नीट पेपरफुटीचा मुद्दा कुठवर जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड-

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड-प्लेसमेंटचा नव…