Home संस्कृतिक १५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणार्‍या कार्यक्रमात, कोल्हापुरातील श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनचे कलाकार सहभागी होणार,

१५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणार्‍या कार्यक्रमात, कोल्हापुरातील श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनचे कलाकार सहभागी होणार,

5 second read
0
0
11

no images were found

१५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणार्‍या कार्यक्रमात, कोल्हापुरातील श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनचे कलाकार सहभागी होणार, खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार आणि शुभेच्छा

येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी, नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणार्‍या शासकीय कार्यक्रमात, महाराष्ट्राची पारंपारिक कला सादर करण्यासाठी कोल्हापूरच्या कलाकारांना निमंत्रीत करण्यात आले आहे. त्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी आज श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनच्या कलाकारांना शुभेच्छा दिल्या. तसेच २६ जानेवारी रोजी दिल्लीतील विजयपथावरील मिरवणुकीत चित्ररथात सहभागी असलेल्या कलाकारांचाही सत्कार केला.
कोल्हापूरची कलानगरी आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख आहे. नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे आणि चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीजा लोकसंस्कृती फौंडेशनचे कलाकार यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथ सोहळयात सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या चित्ररथाला यंदा पहिला क्रमांक मिळाला. या चित्ररथासोबत सादर होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमात, कोल्हापूरच्या श्रीजा फाऊंडेशनच्या कलाकारांनी लेझीम नृत्य सादर केले होते. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आज या कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला. दुसरीकडे श्रीजा फाउंडेशनच्या कलाकारांना येत्या १५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे होणार्‍या मुख्य शासकीय कार्यक्रमात महाराष्ट्राची पारंपारिक कला सादर करण्यासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. त्याबद्दलही या कलाकारांचे तोंडभरून कौतुक करत, खासदार महाडिक यांनी अभिनंदन केले. यावेळी सागर बगाडे यांनी खासदार महाडिक यांच्याकडून कोल्हापूरच्या कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन आणि पाठबळ मिळत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे सर्व कलाकारांनीसुध्दा खासदार महाडिक यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते कलावंत सागर बगाडे, श्रीजा लोकसंस्कृती फौंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष शेखर वळीवडेकर, समन्वयक निरांक घाडगे, क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संस्कृतिक
Comments are closed.

Check Also

पुष्पा इम्पॉसिबलमध्ये पुष्पा आपल्या तत्त्वांपेक्षा घराला प्राधान्य देईल का?

पुष्पा इम्पॉसिबलमध्ये पुष्पा आपल्या तत्त्वांपेक्षा घराला प्राधान्य देईल का?  सोनी सब&…