
no images were found
डिझेल टँकर उसाच्या ट्रॉलीला धडकून लागलेल्या आगीत १ ठार; 7 गाड्या जळून खाक
बुधवारी रात्री सुमारे १० वाजता इंधनाची वाहतूक करणारा ट्रक रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकला. ही धडक इतकी भीषण होती की धडकेनंतर डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरने रस्त्यावरच पेट घेतला. धडकेनंतर स्फोट होऊन मोठी आग भडकली होती. ही आग रस्त्यावरील इतर वाहनांमध्येही पसरली. सुमारे ७ वाहने या भीषण अपघातामधील आगीत जळून खाक झाली.
रात्री १० वाजण्याच्या दरम्यान इंधनाने भरलेला टँकर लातूरहून अहमदपूरकडे जात होता. हा इंधनाची वाहतूक करणारा ट्रक रस्त्यावर उभ्या असलेल्या एक ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकला. ही धडक इतकी भीषण होती की धडकेनंतर डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरने त्वरित पेट घेतला. आगीने रौद्ररूप धारण करीत आणखी वाहनांना आपल्या कवेत घेतले. त्यामध्ये एक टँकर, दोन ट्रॅक्टर, एक एसटी बस आणि एका ट्रकचा समावेश आहे. एकूण सात वाहने या आगीत जळून खाक झाली.
एसटी व कारमधील प्रवाशांचे प्राण सुदैवाने वाचले परंतु काहीजण गंभीर जखमी झाले. तसेच टँकरच्या चालकाच्या पायाला जबर जखम झाली आणि या टँकर चालकाचा सहकारी मात्र आगीत जळून खाक झाला. या अपघातात जळून खाक झालेली एसटी बस ही नांदेडहून लातूरकडे जात होती.
स्थानिक तसेच अग्निशमन दल व पोलिस यांनी बचावकार्य करीत दीड तासांच्या प्रयत्नानंतर अखेर आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. तब्बल दीड तास रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर पुन्हा वाहतूक पूर्ववत करण्यात आली. पोलिसांकडून अपघाताची नोंद करून घेउन पुढील तपास सुरु आहे.