
no images were found
विहीर कोसळून देवाच्या दारात 35 जणांचा दुर्दैवी मृत्यू
इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राम नवमीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असतानाच त्याला गालबोट लागलं आहे. एक भयंकर घटना घडली. पूजेसाठी आलेल्या भाविकांवर काळाने घात केला. कन्यापूजनाचा कार्यक्रम असल्याने मंदिरात खूप गर्दी होती. विहिरीच्या छतावर अनेक लोक बसले होते. जास्त वजन झाल्यामुळे छत कोसळले. हे मंदिर सुमारे 60 वर्षे जुने आहे. या विहिरीत 50 हून अधिक बुडल्याची माहिती मिळाली आहे. त्यापैकी 35 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ANI ने दिली आहे.
तर मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 35 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन विभाग, पोलीस जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत 15 हून अधिक मृतदेह हाती लागले. मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोकाकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
इंदूरचे जिल्हाधिकारी इलैया राजा यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर केली आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 4-4 लाखांची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.