Home सामाजिक आमदार अमल महाडीक यांच्याकडून स्वखर्चातून 1100 एलईडी दिवे

आमदार अमल महाडीक यांच्याकडून स्वखर्चातून 1100 एलईडी दिवे

35 second read
0
0
4

no images were found

आमदार अमल महाडीक यांच्याकडून स्वखर्चातून 1100 एलईडी दिवे

शहरातील बंद दिवे लवकरच उजळणार

कोल्हापूर,  : शहरातील व उपनगरातील बंद पडलेल्या पथदिव्यांमुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत असल्याची बाब लक्षात घेऊन लोकसहभागातून पथदिवे उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमांतर्गत आमदार अमल महाडीक यांच्या माध्यमातून मंगळवारी महापालिकेला तिसऱ्या टप्प्यात १,१०० एलईडी पथदिवे सुपूर्द करण्यात आले.

            कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे आयोजित कार्यक्रमात महापौर सौ.रुपाराणी निकम यांनी हे एलईडी पथदिवे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडे सुपूर्द केले. शहरातील विविध भागांतील बंद पडलेले पथदिवे तातडीने बदलण्यासाठी हे दिवे सर्व सदस्यांच्या प्रभागांमध्ये वितरित करण्यात येणार आहेत.

        शहरातील पथदिव्यांच्या बदलासाठी महापालिकेवर आर्थिक भार न टाकता लोकसहभागातून दिवे उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार अमल महाडीक यांनी यापूर्वी दिली होती. त्यानुसार एकूण २,५०० एलईडी पथदिवे देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या निविडणूकीच्या काळात १,००० दिवे त्यांनी बसविले होते. तर दुसऱ्या टप्प्यात ७०० दिवे बसविण्यात आले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यात १,१०० एलईडी पथदिवे महापालिकेला उपलब्ध करून देण्यात आले असून आवश्यकतेनुसार आणखी दिव्यांचीही उपलब्धता आमदार अमल महाडीक यांच्याकडून करून दिली जाणार असलेचे नगरसेवक जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी उप-महापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, उपसभापती सौ.दिपा ठाणेकर, सभागृहनेता मुरलीधर जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, गटनेते आदिल फरास, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, अभिजीत खतकर, अभिजीत मोकाशी, राहुल माने, नगरसेविका सौ.सृष्टी जाधव, सौ.माधूरी व्हटकर, सौ.पुर्वा राणे, अनुराधा खेडकर, सौ.अर्चना पागर, सौ.पल्लवी देसाई, सौ.राजनंदा महाडीक, सौ.माधूरी नकाते, सौ.वंदना मोहिते, सौ.निलांबरी साळोखे, शहर अभियंता रमेश मस्कर, सहा.अभियंता विद्युत नारायण पुजारी, कनिष्ठ अभियंता अमित दळवी, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, निलेश देसाई उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

गोकुळ निवडणूक- शिरोळ तालुक्यातील २५ संस्थांचा भाजपला पाठिंबा

गोकुळ निवडणूक- शिरोळ तालुक्यातील २५ संस्थांचा भाजपला पाठिंबा कोल्हापूर – कोल्हापूर ज…