Home Uncategorized महापालिकेच्या २,५०५ कर्मचाऱ्यांना गणवेश व साडीचे वाटप सुरू

महापालिकेच्या २,५०५ कर्मचाऱ्यांना गणवेश व साडीचे वाटप सुरू

24 second read
0
0
6

no images were found

महापालिकेच्या ,५०५ कर्मचाऱ्यांना गणवेश  साडीचे वाटप सुरू

कोल्हापूर,  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक असलेल्या गणवेशाचे वितरण आजपासून सुरू करण्यात आले. महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या हस्ते कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे झालेल्या कार्यक्रमात प्रतीकात्मक स्वरूपात काही कर्मचाऱ्यांना ड्रेस व साडीचे वाटप करण्यात आले.

          महापालिकेच्या वर्ग ४ मधील शिपाई, पहारेकरी, वॉर्ड बॉय, वर्कशॉपमधील कर्मचारी तसेच सफाई व झाडू कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वापरासाठी गणवेश परिधान करणेस महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार आजपासून महापालिकेच्या १,८०० पुरुष कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी कापड, तर ७०५ महिला कर्मचाऱ्यांना साडीचे वितरण करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने 51 लाख खर्च करण्यात आला आहे.

        यावेळी उप-महापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, उपसभापती सौ.दिपा ठाणेकर, सभागृहनेता मुरलीधर जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, गटनेते आदिल फरास, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, अभिजीत खतकर, अभिजीत मोकाशी, राहुल माने, नगरसेविका सौ.सृष्टी जाधव, सौ.माधूरी व्हटकर, सौ.पुर्वा राणे, अनुराधा खेडकर, सौ.अर्चना पागर, सौ.पल्लवी देसाई, सौ.राजनंदा महाडीक, सौ.माधूरी नकाते, सौ.वंदना मोहिते, सौ.निलांबरी साळोखे, शहर अभियंता रमेश मस्कर, भांडार प्रमुख विशाल सुगते, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, निलेश देसाई उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

राज्यपालांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील ‘अटल संस्मरण’चे प्रकाशन

 राज्यपालांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील ‘अटल संस्मरण‘चे…