no images were found
घरफाळा 6 टक्के सवलत योजनेचा अखेरचा दिवस
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने दि.01 एप्रिल ते दि 30 जून 2026 अखेर सन 2026-27 या आर्थिक वर्षातील घरफाळा रक्कम भरणा केल्यास घरफाळा करामध्ये 6 टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार दि.1 एप्रिल ते दि.29 जून 2026 अखेर 71,008 मिळकतधारकांनी एकूण 34 कोटी 95 लाख इतकी रक्कम भरणा केलेली आहे. या सवलत योजनेमधून नागरीकांना 6 टक्के सवलत योजनेप्रमाणे 1 कोटी 52 लाख 20 हजार 589 रुपये रक्कम सवलत म्हणून देण्यात आलेली आहे.
तसेच ज्या मिळकतधारकांनी अद्यापही आपला घरफाळा भरणा केला नाही त्यांनी आपला घरफाळा भरुण या सवलत योजनेचा लाभ घ्यावा. महानगरपालिकेमार्फत नागरीकांच्या सोईसाठी 6 टक्के सवलत योजनेचा शेवट दिवस असल्याने महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे मंगळवार, दि.30 जून 2026 रोजी सकाळी 9:00 ते रात्री 9:00 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात आलेली आहेत.
तरी नागरिकांच्या सोईसाठी गुगल पे, फोन पे, पेटीएम व महानगरपालिका संकेत स्थळावरुन सुध्दा ऑनलाईन रक्कम भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे घरफाळा विभागीय कार्यालयामधील व नागरी सुविधा केंद्र मधील किओस्क मशिनव्दारे ऑनलाईन रक्कम भरणा करण्याचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.