no images were found
मी रेखासोबत एंजॉय केलाय! -इमरान खान
बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा आता झगमगत्या विश्वापासून दूर असल्यातरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. एक काळ असा होता जेव्हा रेखा यांनी दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण रेखा त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिल्या. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना रेखा यांचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण त्यांच्या नातं कोणासोबतच लग्नापर्यंत पोहोचलं नाही… रेखा यांचं नाव फक्त बॉलिवूड सेलिब्रिटी नाही तर, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं.
सांगायचं झालं तर ७०– ८०च्या दशकात रेखा हिंदी सिनेविश्वावर राज्य करत होत्या. याचदरम्यान, रेखा आणि इमरान खान यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. एका मुलाखतीत खुद्द इमरान यांनी रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं होतं.
रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर इमरान खान म्हणाले होते, ‘काही काळासाठी मला रेखा यांचा सहवास आवडला होता. आम्ही एंजॉय केलं आणि स्वतःच्या मार्गाला लागलो… मला कोणत्या अभिनेत्रीसोबत लग्न करायचं नव्हतं… ‘ असं देखील इमरान खान म्हणाले होते.