no images were found
“डॉ. देव तिच्या आरोग्याची स्थिती खालावत असताना इतके प्रयत्न करताना पाहून, सृष्टीला प्रश्न पडतो की काही नाती खरंच कधी मागे सोडता येतात का,” गुलकी जोशी
सोनी सब वरील यादें आपल्या उबदारपणा, विनोद आणि आकर्षक वैद्यकीय कथांच्या ताज्या मिश्रणाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. जेबीएमएमसी हॉस्पिटलमधील डॉक्टर्स दररोज वेगवेगळ्या आणि अनोख्या केस हाताळतात, पण त्यांचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच अनपेक्षित असतं. त्यामुळे निर्माण होणारे क्षण हे कधी भावनिक, कधी मजेशीर तर कधी प्रेक्षकांना अगदी जवळचे वाटणारे असतात.
आगामी भागांमध्ये, डॉ. देव (इकबाल खान) आपल्या आयुष्यातील सर्वात वैयक्तिक केसचा सामना करतो, जेव्हा त्याची माजी पत्नी आणि हॉस्पिटलची प्रशासकीय प्रमुख सृष्टी अग्रवाल (गुलकी जोशी) ला आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या जाणवू लागतात स्मृती कमी होणे, हालचालींमध्ये अडथळे आणि झोपेत चालण्यासारखे धोकादायक प्रसंग. सृष्टीला काही बिघडलंय हे मान्य करायचं नसतं, पण डॉ. देव सूक्ष्म लक्षणं ओळखतो आणि तिला योग्य वैद्यकीय मदत मिळावी यासाठी खूप प्रयत्न करतो. न्यूरोलॉजिकल आजाराच्या निदान आणि उपचाराच्या काळात तो तिच्या बाजूने उभा राहतो, ज्यामुळे त्यांच्या जुन्या भावना पुन्हा जागृत होतात. मात्र, त्यांचं वाढतं जवळीकपण दिग्विजय (अर्जुन पुंज) साठी तणाव निर्माण करतं आणि डॉ. वाणी (सृष्टी सिंग) साठी गोंधळ, ज्यामुळे गुंतागुंतीच्या भावना आणि अपूर्ण नातेसंबंध उभे राहतात.
सृष्टी आयुष्य बदलणाऱ्या आरोग्य संकटाशी सामना करत असताना, देवची अखंड साथ त्यांना पुन्हा एकत्र आणेल का?
गुलकी जोशी, जी डॉ. सृष्टीची भूमिका साकारते, म्हणाल्या, “या ट्रॅकमध्ये मला सर्वात जास्त आवडतं ते म्हणजे यात अनेक रंग आहेत. वैद्यकीय आव्हानं आहेत, भावनिक क्षण आहेत, पण त्याचबरोबर उबदारपणा आणि विनोदही आहे. सृष्टी ही अशी व्यक्ती आहे जिला इतरांवर अवलंबून राहणं आवडत नाही, त्यामुळे ती मदत नाकारते, तर डॉ. देव तिची काळजी घेण्यासाठी नवनवीन मार्ग शोधतो. देव इतक्या प्रयत्नांनी तिच्यासाठी उभा राहतोय हे पाहून माझ्या व्यक्तिरेखेला प्रश्न पडतो की काही नाती खरंच कधी मागे सोडता येतात का? त्यांचं टोमणे मारणं मजेशीर आहे, पण त्यामागे काळजी आणि ओळखीचं नातं आहे. कथा पुढे जाताना प्रेक्षक नक्कीच विचार करतील की हे क्षण डॉ. देव आणि सृष्टीला पुन्हा जवळ आणतायत का, आणि हाच या ट्रॅकचा सर्वात रोचक भाग आहे.”