Home Uncategorized जिल्हा शंभर टक्के साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवा – डॉ . जॅसमिन

जिल्हा शंभर टक्के साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवा – डॉ . जॅसमिन

0 second read
0
0
11

no images were found

जिल्हा शंभर टक्के साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवा – डॉ . जॅसमिन

कोल्हापूर : राज्याला कोल्हापुर ने नेहमीच एक वेगळी दिशा दिली आहे.केंद्र सरकार पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गंत संपूर्ण कोल्हापूर जिल्हा शंभर टक्के साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . जॅसमिन यांनी केले .
जिल्हा परिषदेच्या व्हिडिओ कॉन्फरसिंग हॉल मध्ये नवभारत साक्षरता कार्यक्रम अंमलबजावणी अनुषंगाने जिल्हास्तरीय नियामक परिषदेची बैठक आज आयोजित करण्यात आली होती.यावेळी त्या बोलत होत्या .
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी,शिक्षण अधिकारी (प्राथमिक) मीना शेंडकर, (योजना) शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे प्रामुख्याने उपस्थित होते. जॅसमिन म्हणाल्या, असाक्षरांना साक्षर करणे ही या मोहिमेचे उद्दिष्ट नसावे .नवसाक्षरता ही सामाजिक चळवळ म्हणून हाती घेण्यात यावी.या कामी महाविद्यालयीन युवकांची मदत घेण्यात यावी. ही मोहीम विहित कालावधीत पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प) यांच्या सहीने महाविद्यालयीन युवकांना प्रमाणपत्र देण्यात येईल असे सांगून, जिल्ह्यातील सर्व गावांचा साक्षरतेच्या अनुषंगाने गावनिहाय डेटा तयार करण्यात यावा असे निर्देश दिले.तर 2022 साली केंद्र सरकारच्या या योजनेला प्रारंभ झाला असून जिल्ह्यासाठी सुमारे 46 हजार 252 निरक्षरांना,साक्षर करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून हे जिल्ह्यातील 13 तालुक्यांना देण्यात आले असल्याची माहिती श्रीमती म्हेत्रे यांनी दिली .
यावेळी जिल्हा सांख्यिकी विभागाच्या उपायुक्त सीमा अर्दाळकर,मनपा शिक्षण विभागाचे प्रतिनिधी विजय माळी , माध्यमिक शिक्षण विभागाचे(कक्ष अधिकारी ) चंद्रशेखर ओतारी , यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

३६५ निक्षय गीत मैफिलींचा यशस्वी टप्पा सांगीतिक उपक्रमातून क्षयरुग्णांना पोषणाची साथ

३६५ निक्षय गीत मैफिलींचा यशस्वी टप्पा सांगीतिक उपक्रमातून क्षयरुग्णांना पोषणाची साथ कोल्हा…