Home Uncategorized महापालिकेची गांधीनगरमध्ये कारवाईची तयारी सोमवारपासून विनापरवाना व्यावसायिक बांधकामांवर निष्कासन मोहीम

महापालिकेची गांधीनगरमध्ये कारवाईची तयारी सोमवारपासून विनापरवाना व्यावसायिक बांधकामांवर निष्कासन मोहीम

42 second read
0
0
15

no images were found

महापालिकेची गांधीनगरमध्ये कारवाईची तयारी सोमवारपासून विनापरवाना व्यावसायिक बांधकामांवर निष्कासन मोहीम

कोल्हापूर,  : गांधीनगरपर्यंतच्या हद्दीतील जागा कोल्हापूर महानगरपालिकेचीच असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गांधीनगर मधील 204 मिळकत धारकांना नोटिसा बजावून त्यांचे म्हणणे घेऊन त्यांचे हेरिंग घेण्यात आले. सदरचे सर्वांचे हेरिंग पूर्ण झाल्यानंतर सर्वांना निष्काशीत करण्याच्या नोटीस दिल्या होत्या. दरम्यान आज महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी गांधीनगर परिसरातील विनापरवाना मिळकतींची संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

            यावेळी आयुक्त डॉ. भारुड यांनी विनापरवाना बांधकाम व व्यवसाय करणाऱ्या संबंधित मालकांना तात्काळ आपल्या दुकानातील साहित्य हलविण्याच्या सूचना दिल्या.

           महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या कारवाई नुसार एकूण 204 प्रकरणांपैकी 177 प्रकरणांमध्ये न्यायालयाची स्थगिती असून ती 25 जूनपर्यंत लागू आहे. उर्वरित 27 प्रकरणांपैकी स्थगिती नसलेल्या निवासी बांधकामांना वगळून व्यावसायिक मिळकतींवर कारवाई करण्यात येणार आहे.

           या पाहणी वेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहायक संचालक नगररचना प्रशांत भोसले, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, डॉ. विजय पाटील, राम काटकर, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता निवास पोवार, अरुण गवळी, उपशहर रचनाकार एन. एस. पाटील, कनिष्ठ अभियंता पदमल पाटील, प्रमोद बराले, चेतन आरमाळ, इस्टेट ऑफिसर शेखर साळोंखे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, विद्युत अभियंता नारायण पुजारी, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, सर्व्हेअर दत्ता पारधी व खुशालचंद राजमाने उपस्थित होते.

           दरम्यान, सोमवार दि. 22 जून रोजी सकाळी 6 वाजल्यापासून गांधीनगर परिसरातील महापालिकेच्या हद्दीतील विनापरवाना व्यावसायिक बांधकामांवर निष्कासन मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या तीन स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक पथकामध्ये सहाय्यक आयुक्त, उपशहर अभियंता, कनिष्ठ अभियंता, पंचनाम्यासाठी घरफाळा लिपिक व सर्व्हेअर यांचा समावेश करण्यात आला आहे.

           कारवाईदरम्यान विद्युत, पाणीपुरवठा, वर्कशॉप, इस्टेट, अतिक्रमण, घरफाळा, नगररचना व विधी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. मोहिमेसाठी एक पोकलँड, तीन जेसीबी, तीन डंपर, तीन गॅस कटर-वेल्डर संच तसेच तीन अतिक्रमण डंपर यांसह आवश्यक यंत्रसामग्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.

           सरस्वती साडी डेपो परिसरातील खुल्या जागेत विनापरवाना उभारण्यात आलेले तीन होर्डिंग्ज निष्कासित सरस्वती साडी डेपो परिसरातील खुल्या जागेत विनापरवाना उभारण्यात आलेले तीन होर्डिंग्ज निष्काशीत करून ते जप्त करण्यात आले. सदरची कारवाई एक जेसीबी व दोन डंपर च्या साह्याने करण्यात आली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

सुमीत इंडस्ट्रीज मोठी घोषणा! 199.75 कोटींचा राइट्स इश्यू; कर्जफेड आणि सौर प्रकल्पासाठी निधी उभारणार

सुमीत इंडस्ट्रीज मोठी घोषणा! 199.75 कोटींचा राइट्स इश्यू; कर्जफेड आणि सौर प्रकल्पासाठी निध…