Home Uncategorized डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरला प्रतिष्ठेची ‘आर्किटेक्ट लुईस आय. कान ट्रॉफी

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरला प्रतिष्ठेची ‘आर्किटेक्ट लुईस आय. कान ट्रॉफी

2 second read
0
0
17

no images were found

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरला प्रतिष्ठेची ‘आर्किटेक्ट लुईस आय. कान ट्रॉफी

कोल्हापूर (प्रतिनिधी):डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरने राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेची आर्किटेक्ट लुईस आय. कान (एलआयके) ट्रॉफीवर नाव कोरले आहे. कागल येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या ‘माळ बंगला’ (शाहू शुगर फॅक्टरी कार्यालय) या वास्तूच्या दस्तऐवजीकरणासाठी महाविद्यालयाला ही ट्रॉफी मिळाली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी अतिशय आनंद व्यक्त करत विद्यार्थी व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

हैदराबाद येथील वॉक्सेन विद्यापीठात ११ ते १४ जून २०२६ या कालावधीत नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडंट्स ऑफ आर्किटेक्चर (नासा-इंडीया) चे ६८ वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले. यामध्ये देशभरातील सुमारे ४०० वास्तुकला महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये वारसा वास्तूंच्या दस्तऐवजीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘एलआयके’ ट्रॉफीसाठी ९० संघांचा सहभाग होता.

नासा-इंडीया ही १९५७ मध्ये स्थापन झालेली जगातील सर्वात मोठ्या वास्तुकला विद्यार्थी संघटनांपैकी एक असून, देशभरातील हजारो आर्किटेक्ट विद्यार्थी या संघटनेशी संलग्न आहेत. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, नेतृत्व, संशोधन आणि व्यावसायिक कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या वारसा वास्तूंचे अभ्यासपूर्ण दस्तऐवजीकरण, विश्लेषण आणि संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी आर्किटेक्ट लुईस आय. कान (एलआयके) ट्रॉफी आयोजित केली जाते. भारतीय वास्तुकला क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो.

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी कागल येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या ‘माळ बंगला’ (शाहू शुगर फॅक्टरी कार्यालय) या वास्तूचे दस्तऐवजीकरण केले. या प्रकल्पाची देशभरातील प्रवेशिकांमधून अंतिम दहा उत्कृष्ट प्रकल्पांमध्ये निवड झाली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या तज्ज्ञ परीक्षक मंडळाने अंतिम मूल्यमापन करून या प्रकल्पाला विजेतेपद बहाल केले. महाविद्यालयाच्या २७ विद्यार्थ्यांनी या प्रकल्पात सहभाग घेतला होता. त्यांना प्रा. शैलेश कडोलकर, प्रा. धनश्री पवार, प्रा. तनया वणकुद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.

दरम्यान याच अधिवेशनात महाविद्यालयाचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी सूरज हुरकडली याला नासा युनिट सेक्रेटरी म्हणून केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. तर नासा आउटरीच को-ऑर्डिनेटर अथर्व कुंभोजकर याला प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

या सर्व विद्यार्थी व मार्गदर्शकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, आर्किटेक्चर विभागप्रमुख प्रा. आय. एस. जाधव आदी उपस्थित होते.

या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, सी.एच.आर.ओ श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

सुमीत इंडस्ट्रीज मोठी घोषणा! 199.75 कोटींचा राइट्स इश्यू; कर्जफेड आणि सौर प्रकल्पासाठी निधी उभारणार

सुमीत इंडस्ट्रीज मोठी घोषणा! 199.75 कोटींचा राइट्स इश्यू; कर्जफेड आणि सौर प्रकल्पासाठी निध…