no images were found
अदाणी आणि गूगल यांची भागीदारी – विशाखापट्टणममध्ये भारतातील सर्वात मोठे डेटा सेंटर कॅम्पस उभारणार
विशाखापट्टणम, भारत:अदाणी एंटरप्रायझेस आणि त्यांची संयुक्त उपक्रम कंपनी अदाणी कॉनेक्स यांनी गूगलसोबत भागीदारी करत भारतातील सर्वात मोठे एआय डेटा सेंटर कॅम्पस आणि अत्याधुनिक हरित ऊर्जा पायाभूत सुविधा उभारण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. हे प्रकल्प आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे विकसित केले जाणार आहे.या धोरणात्मक सहकार्यांतर्गत,गूगल एआय हब – विशाखापट्टणम हे सुमारे 15 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे गुंतवणूक प्रकल्प असून, 2026 ते 2030 या पाच वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने विकसित होणार आहे. या प्रकल्पात गिगावॉट-स्तराचे डेटा सेंटर ऑपरेशन्स, प्रगत समुद्राखालील केबल नेटवर्क, आणि स्वच्छ ऊर्जेवर आधारित प्रणाली यांचा समावेश असेल,जे भारतातील अत्यंत मागणी असलेल्या एआय कामकाजासाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरवतील.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी अदाणीकॉनेक्स आणि एअरटेल यांसह अनेक प्रमुख भागीदार सहभागी राहतील, ज्यामुळे भारताच्या वाढत्या एआय पर्यावरणाला जागतिक दर्जाचे डिजिटल अधिष्ठान प्राप्त होईल.
या प्रकल्पाचा मुख्य गाभा म्हणजे विशाखापट्टणममध्ये बांधण्यात येणारे अत्याधुनिक एआय डेटा सेंटर, जे देशाची संगणन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवून भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्तेतील क्षमतांमध्ये नवे पर्व उघडेल.
दोन्ही कंपन्यांच्या शाश्वत विकासासाठीच्या बांधिलकीला अधोरेखित करत, या प्रकल्पात नवीन वीज प्रसारण लाईन, स्वच्छ ऊर्जा निर्मिती, आणि नवकल्पक ऊर्जा साठवण प्रणालींमध्ये संयुक्त गुंतवणूक केली जाईल. या उपाययोजनांमुळे डेटा सेंटरच्या कामकाजाला पर्यावरणपूरक ऊर्जा मिळेल आणि भारताच्या वीज जाळ्याची क्षमता व लवचिकता आणखी वाढेल.
अदाणी समूहाचे अध्यक्ष श्री गौतम अदाणी म्हणाले, “गूगलसोबत या ऐतिहासिक प्रकल्पासाठी भागीदारी करणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. हे केवळ पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक नाही, तर एका उदयास येणाऱ्या राष्ट्राच्या आत्म्यातील गुंतवणूक आहे. ही भागीदारी राष्ट्रनिर्मितीच्या आमच्या सामायिक दृष्टीकोनाचे प्रतीक असून प्रत्येक भारतीयाला 21व्या शतकातील तंत्रज्ञान साधनांनी सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विशाखापट्टणम आता जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून उदयास येणार आहे, आणि या प्रवासाचे शिल्पकार होण्याचा आम्हाला सन्मान आहे.”
गूगल क्लाउडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री थॉमस कुरियन म्हणाले, “भारताच्या एआय युगातील प्रचंड क्षमतेला उजाळा देण्यासाठी आम्ही ‘गूगल एआय हब’मध्ये गुंतवणूक करत आहोत.हे केंद्र व्यवसाय, संशोधक आणि नवकल्पकांना एआयच्या सहाय्याने वाढ आणि विस्तार साधण्यासाठी आवश्यक पाया प्रदान करेल. अदाणीसोबत काम करताना, आम्ही आमची अत्याधुनिक साधने आणि संसाधने समुदाय आणि ग्राहकांपर्यंत अधिक जवळ नेऊ, जेणेकरून ते जागतिक स्तरावर नवकल्पना, सुरक्षा आणि कार्यक्षमतेसह प्रगती करू शकतील.”
या एआय हब आणि कनेक्टिव्हिटी गेटवेच्या विकासामुळे विशाखापट्टणम,आंध्र प्रदेश आणि अखेर भारत भरातील आर्थिक वाढीस चालना मिळेल.या प्रकल्पामुळे डिजिटल समावेशकता वाढेल, तसेच तंत्रज्ञान, बांधकाम आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये हजारो नवीन रोजगारनिर्मिती होईल.