Home उद्योग अदाणी ग्रीन एनर्जीची स्थापित क्षमता वार्षिक आधारावर २७ टक्क्यांनी वाढून २०.१ गीगावॅटवर; पहिल्या तिमाहीत विक्रमी ₹४,१२२ कोटी ईबीआयटीडीए

अदाणी ग्रीन एनर्जीची स्थापित क्षमता वार्षिक आधारावर २७ टक्क्यांनी वाढून २०.१ गीगावॅटवर; पहिल्या तिमाहीत विक्रमी ₹४,१२२ कोटी ईबीआयटीडीए

3 min read
0
0
5

no images were found

अदाणी ग्रीन एनर्जीची स्थापित क्षमता वार्षिक आधारावर २७ टक्क्यांनी वाढून २०. गीगावॅटवरपहिल्या तिमाहीत विक्रमी ₹,१२२ कोटी ईबीआयटीडीए

अहमदाबाद,: भारतातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक वेगाने वाढणारी शुद्ध अक्षय ऊर्जा कंपनी अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एजीईएल) ने ३० जून २०२६ रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. मजबूत क्षमता विस्तार, वाढलेली ऊर्जा विक्री आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेच्या जोरावर कंपनीने महसूल, ईबीआयटीडीए  आणि रोख नफ्यात लक्षणीय वाढ नोंदवली. या तिमाहीत कंपनीची एकूण स्थापित क्षमता वार्षिक आधारावर २७ टक्क्यांनी वाढून २०.१ गीगावॅटवर पोहोचली असून, ऊर्जा विक्रीत ३० टक्क्यांची वाढ होऊन ती १३,६५७ दशलक्ष युनिट्सपर्यंत पोहोचली.

आर्थिक कामगिरीच्या दृष्टीने, वीजपुरवठ्यातून मिळणारा महसूल २९ टक्क्यांनी वाढून ₹४,२८० कोटींवर पोहोचला, तर वीजपुरवठ्यातील ईबीआयटीडीए  ३३ टक्क्यांनी वाढून विक्रमी ₹४,१२२ कोटी झाला. कंपनीने उद्योगातील आघाडीचे ९४ टक्के ईबीआयटीडीए  मार्जिन कायम राखले असून, रोख नफा २८ टक्क्यांनी वाढून ₹२,२२५ कोटींवर पोहोचला. मजबूत परिचालन क्षमता आणि नव्याने कार्यान्वित झालेल्या प्रकल्पांमुळे ही वाढ साध्य झाली आहे.

या तिमाहीत गुजरातमधील खावडा येथे १,९७२ मेगावॅट-तास (मेगावॅट-अवर) क्षमतेची बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम (बीईएसएस) कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे कंपनीची एकूण स्थापित बीईएसएस क्षमता ३,५५१ मेगावॅट-अवर वर पोहोचली असून, हा जगातील सर्वात मोठ्या एकाच ठिकाणी उभारण्यात आलेल्या ऊर्जा साठवण प्रकल्पांपैकी एक आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ अखेरपर्यंत ५ गीगावॅट अतिरिक्त अक्षय ऊर्जा क्षमता आणि १०,००० मेगावॅट-अवर पेक्षा अधिक बीईएसएस क्षमता उभारण्याच्या दिशेने कंपनी वेगाने वाटचाल करत आहे.

अदाणी ग्रीन एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओआशिष खन्ना म्हणाले, “आर्थिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात आम्ही दमदार कामगिरीने केली असून २० गीगावॅट क्षमतेचा महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या गाठला आहे. भारतातील वाढत्या स्वच्छ ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी आमचा विस्तारित अक्षय ऊर्जा पोर्टफोलिओ आणि ऊर्जा साठवण क्षमता महत्त्वाची भूमिका बजावत आहे. नवीकरणीय ऊर्जा, बॅटरी स्टोरेज आणि पंप् हायड्रो स्टोरेज यांच्या माध्यमातून आम्ही भविष्यासाठी सक्षम, लवचिक आणि २४x७ स्वच्छ ऊर्जा परिसंस्था उभारत आहोत.”

पर्यावरण, सामाजिक जबाबदारी आणि सुशासन (ईएसजी) क्षेत्रातही कंपनीने आपले नेतृत्व कायम राखले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारतीय वीज क्षेत्रातील सर्वोच्च क्रिसिल ईएसजी स्कोअर सलग पाचव्या वर्षी कायम राखत कंपनीने आपला स्कोअर ६६ वरून ६९ पर्यंत वाढवला आहे. याशिवाय, जगातील अग्रगण्य ईएसजी मूल्यांकन संस्थांकडून जागतिक स्तरावरील अव्वल १० कंपन्यांमध्ये स्थान, रॉयटर्स एनर्जी इंडस्ट्री अवॉर्ड्स २०२६ मध्ये ‘क्लीन पॉवर जनरेशन अवॉर्ड’ तसेच एफटीएसई रसेल कडून पर्यायी वीज क्षेत्रात सलग दुसऱ्या वर्षी जागतिक क्रमांक एक असा सन्मान मिळवत एजीईएल ने शाश्वत विकासाच्या दिशेने आपली वचनबद्धता अधिक मजबूत केली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

“रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम

“रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी न…