Home राजकीय कोल्हापुरातील मार्केट यार्डात शेतकऱ्यांनी गूळ सौदे पाडले बंद

कोल्हापुरातील मार्केट यार्डात शेतकऱ्यांनी गूळ सौदे पाडले बंद

0 second read
0
0
30

no images were found

कोल्हापुरातील मार्केट यार्डात शेतकऱ्यांनी गूळ सौदे पाडले बंद

कोल्हापूर  : गुळाला किमान हमीभाव मिळावा आणि व्यापाऱ्यांकडून होत असलेली पिळवणूक बंद व्हावी यासाठी आज मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत गुळ सौदे बंद पाडले. जोपर्यंत गुळाला ३७०० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत नाही तोपर्यंत गुळ सौदे सुरू न करण्यावर गुळ उत्पादक शेतकरी ठाम आहेत. प्रशासक प्रकाश जगताप यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी धक्कादायक माहिती गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी समोर आणत भांडाफोड केली. कर्नाटकात तयार झालेला गुळ हा कोल्हापूरचा गुळ म्हणून मोठ्या प्रमाणावर विक्रीला येत असल्याचे समोर आणले.
कर्नाटकच्या गुळाची पोलखोल ही शेतकऱ्यांनी प्रशासकांसमोर केली. ही बाब गंभीर असून यावर कायदेशीरित्या कारवाई करण्याची मागणी गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासकांच्याकडे केली. प्रशासकांनी आपण आपल्या सर्वाधिकरांचा वापर करून या ठिकाणी कारवाई करू असा आश्वासन शेतकऱ्यांना दिले. गेल्या महिनाभरापासून गुळाचे दर घसरत चालल्याने कोल्हापूरमध्ये गुऱ्हाळघरे अखेरची घटका मोजू लागली आहेत. गुळाला किमान हमीभाव मिळावा आणि व्यापाऱ्यांकडून होत असलेली पिळवणूक बंद व्हावी यासाठी आज मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत गुळ सौदे बंद पाडले. गुळाचे दर वाढणार नाही तोपर्यंत गुळ सौदे चालू करू देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. कोल्हापूरच्या नावाखाली कर्नाटकच्या गुळाची होत असलेली विक्रीही यावेळी शेतकऱ्यांनी दाखवून दिली. त्यामुळे कोल्हापूरच्या गुळाच्या नावावर फसवणूक होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी गुळाला हमीभाव मिळालाच पाहिजे, अशी मागणी एकमुखाने मागणी केली. गुळाचा दर घसरून 3 हजारांवर आला आहे. किमान ३७०० रुपये दर मिळावा, जेणेकरून उत्पादन खर्च निघेल, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. एका शेतकऱ्याने व्यथा व्यक्त करतानाना सांगितले की, कधीकाळी कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असणारी १२०० गुऱ्हाळघरे ३००वर आली. त्यानंतर १८० वर येऊन पोहोचली. आता केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतपत ६० ते ६५ गुऱ्हाळघरे आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून दर पडला आहे. साखर कारखान्यांकडून उसाला प्रतिटन सरासरी 3 हजार रुपयांवर दर मिळत असताना गूळ मात्र कवडीमोलाने विकला जात आहे.
कर्नाटकमध्ये गुळाचा उत्पादन खर्च कमी असल्याने तो गूळ कोल्हापूरच्या मार्केट यार्डात कोल्हापुरी गुळाच्या नावाचे पॅकिंग करून विकला जात आहे. त्यामुळे त्याची पाहणी आज अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यामुळे ही सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक आहे. कर्नाटकमध्ये 3 हजार ते 3100 रुपयांपर्यंत तयार केला जातो. त्यानंतर हाच गूळ कोल्हापूरचे लेबल आणि पॅकेजिंग करून कोल्हापूरच्या नावाने गुजरातसह बाहरेच्या राज्यांमध्ये विकला जातो. त्यामुळे कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची आणि ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला..

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…