Home मनोरंजन ‘वंशज’ मालिकेत युविका कबीरच्या रहस्यमय भूतकाळाची पाळंमुळं शोधून काढणार

‘वंशज’ मालिकेत युविका कबीरच्या रहस्यमय भूतकाळाची पाळंमुळं शोधून काढणार

12 second read
0
0
27

no images were found

‘वंशज’ मालिकेत युविका कबीरच्या रहस्यमय भूतकाळाची पाळंमुळं शोधून काढणार

 

सोनी सबवरील ‘वंशज’ मालिकेत पुरूषांचे वर्चस्व असलेल्या महाजन साम्राज्यातील सत्तेच्या संघर्षात युविका (अंजली तत्रारी) या जिद्दी तरुणीचा प्रवास दाखवला आहे. येथे तिचे सगळे प्रतिस्पर्धी या व्यवसायाचे नेतृत्व करण्यात ती कशी अपयशी ठरते, हे बघण्यासाठी टपलेले आहेत. अलीकडच्या भागांमध्ये महाजनांना नष्ट करण्याचा कबीरचा (सरवर आहुजा) अजेंडा असल्याचे समजल्यावर युविकाचा कबीरशी (सरवर आहुजा) सामना होतो. त्याच्या कृतीमागील उद्देश समजून घेण्यासाठी, आपल्या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात ती त्याचा भूतकाळ खणून काढते. कबीरचा जन्म दाखला युविकाच्या हाती येतो, तेव्हा एक सकारात्मक वळण येते. यातूनच तिला त्याच्या गूढ भूतकाळातील रहस्ये उलगडतात.

आगामी भागांमध्ये, कबीरचा भूतकाळ जाणून घेण्यासाठी युविका आपले प्रयत्न चालू ठेवते आणि त्याच्या आई-वडिलांचा शोध घेऊ लागते. या दरम्यान, एका मृत बालकासाठी भूमी (गुरदीप पुंज) ला काही धार्मिक विधी करताना पाहून DJ (माहिर पांधी)च्या आईच्या म्हणजे गार्गी (परिणिता सेठ)च्या मनात एक विचार चमकून जातो की, युविकाचा जन्म होण्याअगोदर भूमीला एक अपत्य असावे का? इकडे, आपला रहस्यमय भूतकाळ लपवत असताना कबीर युविकाच्या जीवनात खळबळ माजवण्याचा प्रयत्न करतो. पण, युविकाने पक्का निर्धार केला आहे. त्याची छुपी रहस्यं ती नक्की शोधून काढणार!

भूमी आणि कबीरच्या भूतकाळाचे रहस्य यांच्यात काही संबंध असणार का, की हा केवळ एक गैरसमज आहे?

युविकाची भूमिका करणारी अंजली तत्रारी म्हणते, “आपले जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी कबीर इतका का उतावळा झाला आहे आणि महाजनांविषयी त्याच्या मनात इतका तिरस्कार का आहे, हे शोधून काढण्याचा निर्धार युविकाने केला आहे. आगामी कथानकात एक धक्कादायक वळण येणार आहे, जे प्रेक्षकांची उत्कंठा वाढवेल. मी प्रेक्षकांची प्रतिक्रिया बघण्यासाठी जितकी उत्सुक आहे तितकीच युविका या नाट्याची प्रतिक्रिया कशी देते हे जाणून घेण्यासाठीही आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…