Home Video अहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधव

अहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधव

10 second read
0
0
9

no images were found

अहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधव

कोल्हापूर,(प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जाज्ज्वल्य कार्यकर्तृत्वाबरोबरच त्यासाठी त्यांनी सोसलेल्या संघर्षाची गाथाही समाजासमोर यायला हवी, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी व्यक्त केली.

      विद्यापीठात आज प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांच्या हस्ते रामभाऊ लांडे लिखित ‘लाइफ अँन्ड वर्क ऑफ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ या इंग्रजी चरित्र पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. मल्हार सेनेचे बबनराव रानगे प्रमुख उपस्थित होते.

प्र-कुलगुरू डॉ. जाधव म्हणाल्या, अहिल्यादेवी होळकर यांनी वडिल आणि सासरे यांच्या कणखर पाठिंब्याने आपल्या कार्याची सुरवात केली असली तरी एक महिला म्हणून त्यांना अनेक अडचणींतून जावे लागले. अनेक समस्यांवर मात करीत त्यांनी आपली वाटचाल केली आणि त्यातून उत्तुंग कार्याची उभारणी केली. ते कार्य महत्त्वाचे आहेच, मात्र त्यामागील संघर्ष आणि त्यागही जनतेसमोर यायला हवा. त्या दृष्टीने अभ्यासक आणि संशोधकांनी संदर्भांचा धांडोळा घेतला पाहिजे. अहिल्यादेवींचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आधुनिक माध्यमांचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी पुस्तकावर भाष्य केले. ते म्हणाले, रामभाऊ लांडे हे केवळ लेखक नाहीत, तर होळकरशाहीचे संशोधक आहेत. त्यामुळे त्यांच्या हातून अहिल्यादेवींविषयीचे पुस्तक इंग्रजीतून साकार होणे, महत्त्वाचे आहे. उपलब्ध सर्व साधनांचा आधार घेऊन त्यांनी अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचे विविध पैलू उलगडले आहेत. धार्मिकतेच्या पलिकडेही अत्यंत वेगळ्या लोककल्याणकारी भूमिकेतून अहिल्यादेवींनी कार्य केले. त्यांनी केलेला दानधर्म हा त्यांनी राज्याच्या दौलतीमधून नव्हे, तर त्यांच्या खासगी निधीमधून केला, हा फार महत्त्वाचा संदर्भ या पुस्तकातून सामोरा आला आहे. तो अमूल्य स्वरुपाचा आहे. यावरुन एक राज्यकर्ता म्हणून त्यांचे मोठेपण अधोरेखित होते.

यावेळी लेखक श्री. लांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासनाचे समन्वयक डॉ. मच्छिंद्र गोफणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. दत्तात्रय घुटुगडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला तेजस प्रकाशनचे रावसाहेब पुजारी, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. प्रभंजन माने, डॉ. दत्तात्रय मचाले, अशोक परीट, डॉ. चांगदेव बंडगर, नारायण मोटे-देसाई, प्रताप चिपळूणकर, यश आंबोळे, अजय गोदे, अजय पुजारी, वैभव जानकर, संतोष कोळेकर आदी उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

एपीएसईझेडने एआय-आधारित परिवर्तनाला गती देण्यासाठी अमेरिकेतील कॅलेरिससोबतची भागीदारी मजबूत केली

एपीएसईझेडने एआय-आधारित परिवर्तनाला गती देण्यासाठी अमेरिकेतील कॅलेरिससोबतची भागीदारी मजबूत …