no images were found
गुरुवारी ‘जनता दरबार’ — महापौर सौ.रुपाराणी निकम यांचा उपक्रम
कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या महानगरपालिकेमधील कामकाजामध्ये होत असलेल्या अडीअडचणी जलदगतीने सोडविण्यासाठी “जनता दरबार” चे आयोजन केले आहे.
त्यानुसार गुरुवार, दि.11 जून 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात जनता दरबार घेण्यात येणार आहे. यासाठी सकाळी 11 ते 12 या वेळेत नागरीकांनी आपले अर्ज सादर करावेत. या जनता दरबारामध्ये महापौर म्हणून सौ.रुपाराणी निकम नागरिकांच्या तक्रारी व मागण्या प्रत्यक्ष ऐकून घेणार आहेत. यावेळी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ज्या तक्रारीबाबत कोर्टामध्ये दावे प्रलंबित आहेत अथवा सुरु आहेत असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
तरी शहरातील नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात संबंधित कागदपत्रांसह सादर करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.