no images were found
नवीन घनकचरा व्यवस्थापन वल्क वेस्ट जनरेटर (BWG) यांच्यासाठी कार्यशाळा
कोल्हापूर : घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ अन्वये बल्क वेस्ट जनरेटर (Bulk Waste Generators – BWG) यांच्यावर घनकचऱ्याचे स्त्रोतावर वर्गीकरण, ओल्या कचऱ्याची जागेवर प्रक्रिया, पुनर्वापरयोग्य कचऱ्याचे व्यवस्थापन तसेच पर्यावरणीय मानकांचे पालन करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. तसेच उच्च न्यायालयामध्ये दाखल पंचगंगा नदी प्रदूषण विषयक जनहित याचिका (PIL) मध्ये नदीपात्र व पर्यावरणावर होणाऱ्या घनकचऱ्याच्या दुष्परिणामांबाबत गंभीर निरीक्षणे नोंदविण्यात आलेली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांनी घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करणे, कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करणे व पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने BWG घटकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत व संभाव्य BWG यांच्यासाठी नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ मधील तरतुदी, जबाबदाऱ्या व अंमलबजावणी यावावत जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. हि कार्यशाळा गुरुवार, दि. ११ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता महापालिकेचया छत्रपती ताराराणी सभागृहात होणार आहे.
या कार्यशाळेस आयोजक म्हणून शहरातील गृहनिर्माण सोसायट्या व निवासी संकुले, हॉटेल्स, रेस्टॉरंट व केटरिंग संस्था, रुग्णालये व आरोग्य संस्था, शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्था, शॉपिंग मॉल्स व व्यावसायिक संकुले, मंगल कार्यालये व कार्यक्रम स्थळे, बाजारपेठा व व्यापारी संस्था, धार्मिक संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालये, इतर पात्र बल्क वेस्ट जनरेटर्स यांच्यासाठी आयोजित केली आहे. या कार्यशाळेतील प्रमुख विषय
घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ मधील नवीन तरतुदी, BWG यांची कायदेशीर जबाबदारी, स्त्रोतावर कचरा वर्गीकरण , ओल्या कचऱ्याचे ऑन-साईट कंपोस्टिंग / बायोमिथेनेशन, पंचगंगा नदी प्रदूषण प्रतिबंधामध्ये BWG यांची भूमिका, नियमांचे उल्लंघन केल्यास होणारी दंडात्मक कारवाई व कोल्हापूर महानगरपालिकेची BWG नोंदणी व अनुपालन प्रणाली यांचा समावेश आहे.
या कार्यशाळेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व विविध तज्ञ उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यशाळेत संबंधितांनी उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.