Home सामाजिक प्रदीप अग्रवाल लीडरशीप एक्सलेन्स अवॉर्डने सन्मानित

प्रदीप अग्रवाल लीडरशीप एक्सलेन्स अवॉर्डने सन्मानित

1 second read
0
0
235

no images were found

प्रदीप अग्रवाल लीडरशीप एक्सलेन्स अवॉर्डने सन्मानित

कोल्हापूर : पुणे शहरातील नामवंत बेंझर पेंट्सचे संचालक प्रदीप अग्रवाल यांचा लीडरशीप एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

मुंबईतील मीडिया स्पेस इन कॉरपोरेशनच्या वतीने देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्यार्‍यांचा सन्मान करण्यात येतो. नुकतेच मुंबईतील ललित हॉटेलमध्ये अभिनेत्री दिया मिर्झाच्या हस्ते प्रदीप अग्रवाल यांना लीडर शीप एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. प्रदीप अग्रवाल यांच्यासोबत विविध क्षेत्रात काम करण्यारे युवक, महिला आणि व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

दरम्यान, प्रदीप अग्रवाल यांनी १९८० मध्ये बेंझर पेंट्स नावाने पेंट्स निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. आज यांचा व्यवसाय फक्त महाराष्ट्रात नाही तर गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, गोवा, आंध्र प्रदेशमध्ये विस्तारलेला आहे. बेंझर पेंट्स ही कंपनी दर्जेदार डिस्टेंपर पेंट, प्राइमर पेंट, ऑईल पेंट इत्यादींचे उत्पादन करते. उत्पादनांची प्रीमियम गुणवत्ता आणि परवडणाऱ्या किमतीमुळे जास्त मागणी असून बेंझर पेंट्सने नावलौकिक मिळवले आहे. व्यवसायासोबत प्रदीप अग्रवाल सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. लायन्स क्लबसोबत मिळून अन्नदान, गरजूंना शालेय साहित्य, कपडेदान, वारकऱ्यांना औषधोपचार आदी कार्य करतात. त्यांच्या व्यवसायाची प्रगती आणि सामाजिक काम पाहता हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम कोल्हापूर/ प्रतिनिधी:-…