Home Uncategorized पद्मश्री जनार्दन बोथे यांचा महाराष्ट्र सदनात सत्कार

पद्मश्री जनार्दन बोथे यांचा महाराष्ट्र सदनात सत्कार

1 second read
0
0
22

no images were found

 पद्मश्री जनार्दन बोथे यांचा महाराष्ट्र सदनात सत्कार

नवी दिल्ली, : आपल्या समर्पित लोकसेवेने महाराष्ट्राची मान राष्ट्रीय पातळीवर उंचावणारे पद्मश्री जनार्दन बोथे यांचा महाराष्ट्र सदनात आज एक विशेष कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर. विमला यांच्याहस्ते त्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र सदनात आयोजित या सोहळ्याला माहिती संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक प्रमोद कोलपते उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना श्री. बोथे म्हणाले,देशाच्या राजधानीत आणि विशेषतः आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र सदनात झालेला हा सत्कार माझ्यासाठी घरच्या कौतुकासारखा आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्या एकट्याचा सन्मान नसून, माझ्या जीवनात आलेले महान संत, स्वातंत्र्यसेनानी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा आणि कार्याचा हा गौरव आहे. महाराजांनी स्थापन केलेल्या अमरावतीच्या गुरुकुंज आश्रमातून हजारो विद्यार्थी आणि कार्यकर्ते देशाची संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रप्रेम जगवण्यासाठी अविरत काम करत आहेत. त्या गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली, म्हणूनच आज मी इथपर्यंत पोहोचू शकलो असेही त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी बोलताना निवासी आयुक्त आर. विमला यांनी जनार्दन बोथे यांच्या कार्याचा गौरव केला. महाराष्ट्राच्या मातीतून देशपातळीवर चमकणाऱ्या अशा ज्येष्ठ आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्वाचा सत्कार करण्याची संधी महाराष्ट्र सदनाला मिळाली, हे आमचे भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

माहिती संचालक हेमराज बागुल यांनी बोथे यांचे सामाजिक कार्य या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र सदनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मान

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंड…