no images were found
महाडिकांना बदनाम करण्याचा डाव हाणून पाडू…… गोकुळ चे माजी संचालक धैर्यशील बजरंग देसाई
गारगोटी ( प्रतिनिधी): गेली 35 वर्षात महाडिक यांनी गोकुळ दूध संघ कौशल्यपूर्ण चालवून हिताचे समाजकारण केले असून त्यांनी गोकुळला राजकारणापासून बाजूला ठेवले त्याची क्वचित ही झळ लागू दिलेली नाही असे असताना देखील काही नेते मंडळींचे भाडोत्री कार्यकर्ते वड्याचे तेल वांग्यावर काढून गोकुळला तसेच महाडिकांना बदनाम करण्याचा डाव असून हा डाव दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या ध्यानात आला असून हा डाव हाणून पाडतील असे प्रसिद्धिपत्रक गोकुळचे माजी संचालक धैरशील बजरंग देसाई यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की महाडिक यांच्यावर जी टीका सुरू आहे ती निंदनीय असून 35 वर्षात त्यांनी चांगला कारभार केलेला आहे त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांच्या संस्थेतील कारभाराचे परीक्षण करावे म्हणजे गोकुळ किती दिमाखात वाटचाल करत आहे याची त्यांना कल्पना येईल गोकुळ देशात अग्रगण्य असून त्या संस्थेच्या हिताला बाधा ठरणारे वक्तव्य नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी करू नयेत.
मुळातच राज्यात यांचेचे सरकार, गोकुळ मध्ये यांची सत्ता असताना देखील गोकुळ मध्ये प्रशासक येणे ही काही गौरवस्पद बाब नसून संघाला बदनाम करण्यासाठी यांच्यात कार्यकर्त्यांनी विडा उचलला असल्याचे सर्वसाधारण लोकांच्या मध्ये लक्षात आलेले आहे नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी ही बाब लक्षात घ्यावी की आप आपल्या चाललेल्या संस्थेतील लेखाजोखा यांच्या नेत्यांनी मांडला तर लोकांनाही यातील खरी गोम कळेल
गोकुळची बदनामी दूध उत्पादक शेतकऱ्यांना खटकू लागले असून भविष्यात त्याचा सोक्षमोक्ष गोकुळची उत्पादक मतदार लावतील 35 वर्षात गोकुळची एवढी बदनामी कधीच नव्हती मग आत्ताच कशी काय सुरू झाली आहे.
महाडिकांनी उत्पादकाला चांगला दर दिलाच पण त्याचबरोबर संघ मजबूत आणि सुस्थितीत ठेवण्याचे काम हे त्यांनी केले आहे गोकुळ चा ब्रँड मुंबईसारख्या महानगरात प्रस्थापित करून गोकुळा कायमची हक्काची बाजारपेठ मिळवून दिली वेळोवेळी उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांच्या संसाराला मोठ्या प्रमाणात हातभार लावला त्याचबरोबर संस्थांचे हित कायमपणे अबाधित ठेवले.
महाडिक यांच्यावर सातत्याने होणारी बदनामीकारक टीका आम्ही कधीही खपवून घेणार नसून टीका थांबली नाही तर जशास तसे उत्तर देण्याचा इशारा गोकुळ चे माजी संचालक धैर्यशील बजरंग देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.