no images were found
प्रशासकीय कामकाज पार पाडण्याकरीता 64 कर्मचाऱ्यांची नियुक्ती
कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्राचे प्रशासकीय कामकाज पार पाडणे करीता आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशाने चार प्रभाग क्षेत्र कार्यालये सक्षम करण्यात आलेली आहे. या अतंर्गत या विभागीय कार्यालय क्र. 1 ते 4 कडील प्रशासकीय कामकाज पार पाडण्याकरीता वर्ग चार कडील 64 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विविध विभागातील कामकाज सुरळित चालविण्या करीता कर्मचारी कमी पडत आहे. त्यामुळे सहा.आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या विविध विभागात कर्मचारी कमी पडत असलेल्या त्या विभागाकडे ही कर्मचारी देवून तिथील कामकाज जलद गतीने होण्या करीता मदत होणार आहे. त्यामुळे विभागीय कार्यालय क्र. 1 ते 4 अंतर्गत ही कर्मचारी फिल्डवर्क प्रमाणे कामकाज पाहणार आहेत. त्यामध्ये परवाने, वसुली, आरोग्य, पाणीपुरवठा, अतिक्रमण निर्मूलन, बागाखाते इत्यादी अशा ठिकाणी वर्ग चारीची 64 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे नागरिकांना अनेक सेवा महापालिकेच्यावतीने उपलब्ध होणार असून महापालिकेच्या कामकाजात वेग व पारदर्शकता वाढणार आहे. या कामनसाठी मंगळवारी 64 कर्मचाऱ्शंची नियुक्ती केली आहे. याचे आदेश आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी काडले आहे.