Home Uncategorized पावसाळी आरोग्य रहस्ये: सोनी सबच्या यादें मालिकेतील कलाकारांनी सांगितले त्यांचे आवडते घरगुती उपाय

पावसाळी आरोग्य रहस्ये: सोनी सबच्या यादें मालिकेतील कलाकारांनी सांगितले त्यांचे आवडते घरगुती उपाय

10 second read
0
0
7

no images were found

पावसाळी आरोग्य रहस्ये: सोनी सबच्या यादें मालिकेतील कलाकारांनी सांगितले त्यांचे आवडते घरगुती उपाय

 सोनी सबचं यादें प्रेक्षकांना उबदारपणा, विनोद आणि आकर्षक मेडिकल स्टोरीजच्या ताज्या मिश्रणाने सतत एंटरटेन करतंय. जेबीएमएमसी हॉस्पिटलमधले डॉक्टर्स ऑन‑स्क्रीन रुग्णांवर उपचार करण्यात व्यस्त असतात, पण ऑफ‑स्क्रीन कलाकारांकडे पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी स्वतःचे घरगुती उपाय आहेत.पावसाळ्यात खोकला, सर्दी आणि व्हायरल इन्फेक्शन्स वाढतात, अशा वेळी कलाकारांचा विश्वास आहे की पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या काही साध्या सवयी खूप उपयोगी ठरतात. गरम काढा आणि हळदीचं दूध पिणं, हायड्रेटेड राहणं आणि घरगुती आरामदायी पदार्थांचा आस्वाद घेणं या छोट्या सवयींनी कलाकारांना लांब शूटिंग शेड्यूल्समध्येही निरोगी राहायला मदत होते.

      गुलकी जोशी, जी ‘यादें’मध्ये डॉ. सृष्टी अग्रवालची भूमिका करते, म्हणाली, “पावसाळा आला की मला नेहमी घरची आठवण येते कारण तेव्हाच सगळे पारंपरिक उपाय आठवतात. माझा आवडता उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी हळदीचं दूध, विशेषतः लांब शूटनंतर थकवा जाणवत असेल तर. मी दिवसभर गरम पाणी पिण्याचा प्रयत्न करते आणि शक्य तितकं थंड पेय टाळते. या साध्या सवयी आहेत, पण माझ्यासाठी नेहमी उपयोगी ठरल्या आहेत.”

     इकबाल खान, जो ‘यादें’मध्ये डॉ. देव मेहता साकारतो, म्हणाला, “माझा पावसाळ्यातला रूटीन खूप साधा आहे. मी दिवसाची सुरुवात कच्च्या हळदीच्या छोट्या तुकड्याने आणि कोमट पाण्याच्या ग्लासने करतो. ही सवय मी वर्षानुवर्षं पाळली आहे आणि मला खरंच वाटतं की यामुळे मी निरोगी राहतो. पावसाळ्यात मी शक्य तितकं स्ट्रीट फूड टाळतो, विशेषतः कारण शूटिंग शेड्यूल्समुळे आम्ही सतत प्रवासात असतो. या छोट्या सवयींसोबत मी नेहमी देवाला प्रार्थना करतो की मला फिट ठेवावं आणि रोज माझं सर्वोत्तम देण्यासाठी ऊर्जा द्यावी. आणि जर मी आजारी पडलो तर मी त्याकडे शरीराला विश्रांती देण्याची आठवण म्हणून पाहतो, जेणेकरून पुन्हा नव्या ताकदीने कामाला लागू शकू.”

     देविष आहुजा, जो ‘यादें’मध्ये डॉ. रौनकची भूमिका करतो, म्हणाला, “आमच्या घरात एक मजेशीर नियम आहे बाहेर पाऊस पडत असेल तर पकोडे खाणं अगदी कॉम्पल्सरी आहे, पण त्यासोबत घरगुती काढाही! हा आमचा बॅलन्स साधण्याचा मार्ग आहे. मी नेहमी जवळ छोटा डब्बा ठेवतो ज्यात गूळ आणि भाजलेली बडीशेप असते कारण माझी आजी नेहमी सांगायची की पावसाळ्यात पचनासाठी हे खूप उपयोगी आहे. ही आमच्या घरची परंपरा आहे जी माझ्यासोबत राहिली आहे आणि मला ती पाळायला खूप आवडतं.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

पुष्पा इम्पॉसिबल भारताला प्रेरणा देत आहे कारण खरी ताकद ही मूल्ये आणि प्रामाणिकपणात असते हे दाखवत आहे

पुष्पा इम्पॉसिबल भारताला प्रेरणा देत आहे कारण खरी ताकद ही मूल्ये आणि प्रामाणिकपणात असते हे…