Home सामाजिक पंचगंगा घाट व शाहू मिल परिसराची महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्याकडून पाहणी :आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश

पंचगंगा घाट व शाहू मिल परिसराची महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्याकडून पाहणी :आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश

8 second read
0
0
6

no images were found

पंचगंगा घाट व शाहू मिल परिसराची महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्याकडून पाहणी :आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश

 कोल्हापूर : कोल्हापूर शहर व जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढून 36 फुटांवर पोहचली असून ती इशारा पातळीच्या दिशेने जात आहे. या पार्श्वभूमीवर महापौर सौ.रुपाराणी निकम यांनी आज पंचगंगा नदी घाटा परिसराला भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली. संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेऊन सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. पूरबाधित क्षेत्रातील नागरीकांसाठी निवारा केंद्रे सज्ज ठेवण्याबरोबरच पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या भागातील नागरीकांना वेळेत स्थलांतरीत करण्याबाबत जनजागृती करण्याचे निर्देशही महापौरांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिले. यानंतर ऐतिहासिक छत्रपती शाहू मिलची कोटीतीर्थ तलावाकडे जाणारी संरक्षण भिंत कमकुवत झालेने रात्री अचानक ढासळली होती. या ढासळलेल्या भिंतीची महापौर सौ.रुपाराणी निकम यांनी पाहणी करुन राज्य वस्त्रोद्योग महामंडाळाच्या स्थानिक व्यवस्थापकास धोकादायक भिंत उतरून घेण्याच्या सूचना दिल्या. जेणेकरुन याठिकाणी पदाचाऱ्यास अथवा गाडी धारकास कोणतीही दुर्घटना होऊ नये याची दक्षता घ्यावी. यासाठी उर्वरीत भिंतीचे स्थैर्यता तपासून घ्याव्यात व महामंडळाच्या वरिष्ठ स्तरावर याची माहिती द्यावी असे सांगितले. यानंतर राजारामपूरी येथील विभागीय कार्यालय क्रं.3 ला भेट देऊन याठिकाणी असलेल्या कार्यालयांची पाहणी केली. 

            यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, सहा.संचालक नगररचना प्रशांत भोसले, शहर अभियंता रमेश मस्कर, नगरसेविका सौ.माधुरी व्हटकर, सौ.रेखा उगवे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, अरुणकुमार गवळी, उपशहर रचनाकार एन एस पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, पदमल पाटील, मीरा नगीमे आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

रत्नागिरी मान्सून आरोग्य सल्ला : स्टार हेल्थकडून ताप, डेंग्यू आणि मलेरियाच्या प्रादुर्भावाबाबत इशारा;

रत्नागिरी मान्सून आरोग्य सल्ला : स्टार हेल्थकडून ताप, डेंग्यू आणि मलेर…