Home सामाजिक जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण समितीची पहिली सभा उत्साहात

जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण समितीची पहिली सभा उत्साहात

1 second read
0
0
7

no images were found

जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण समितीची पहिली सभा उत्साहात

कोल्हापूर, : जिल्हा परिषद कोल्हापूर येथील महिला व बाल कल्याण समितीची पहिली सभा नवनियुक्त सभापती विद्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्व. वसंतराव नाईक समिती सभागृहात उत्साहात पार पडली.
सभेच्या प्रारंभी जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा सचिव नितीन मस्के यांनी सभापती विद्या पाटील तसेच नवनियुक्त सदस्य वर्षाराणी पाटील, शिवानी भोसले, शैलजा पाटील, रोहिणी आबिटकर, संयोगिता मोरे, सोनाली पाटील आणि पंचायत समिती गडहिंग्लजच्या सभापती प्रतिभा चव्हाण यांचे स्वागत केले. यावेळी सन २०२६-२७ या वर्षातील विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
सभेत विविध महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सन २०२५ च्या शासन निर्णयानुसार सुरू असलेल्या लोककल्याणकारी योजनांची सन २०२६-२७ मध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून, याबाबत पुढील सभेत ठोस निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. तसेच जिल्ह्यात कार्यरत महिला समुपदेशन केंद्रांच्या मानधनवाढीचा मुद्दा चर्चिला गेला. यासंदर्भात जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
अंगणवाडी सक्षमीकरणावरही विशेष भर देण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन अंगणवाडी इमारती उभारणे तसेच जीर्ण व नादुरुस्त इमारतींची तातडीने दुरुस्ती करण्याच्या आराखड्यावर चर्चा झाली. याशिवाय ग्रामीण भागातील तळागाळातील गरजू लाभार्थ्यांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचावा यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावी पावले उचलावीत, अशा सूचना सभेत देण्यात आल्या.या सभेस समितीचे सदस्य तसेच महिला व बाल कल्याण विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

हस्तिनापुर के वीर’ मालिकेत भेटा तरुण कौरव आणि पांडवांना आणि जाणून घ्या त्यांचा प्रवास, ज्यातून ते जगभरात स्मरणात राहिलेले दंतकथा बनले.

हस्तिनापुर के वीर’ मालिकेत भेटा तरुण कौरव आणि पांडवांना आणि जाणून घ्या त्यांचा प्रवास, ज्य…