no images were found
आमदार हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन………
गडहिंग्लजला ९८ लाखांच्या उपनिबंधक कार्यालय इमारतीचे भूमिपूजन………
गडहिंग्लज : गडहिंग्लजमध्ये नव्याने बांधकाम होणाऱ्या उपनिबंधक कार्यालय इमारतीमुळे नागरिकांचे त्रास वाचतील, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. या कार्यालयाकडे दस्त करण्यासाठी येणाऱ्यांना आवश्यक सर्व त्या सुविधा पुरविल्या जातील, असेही ते म्हणाले.
गडहिंग्लजमध्ये उपनिबंधक कार्यालय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात आमदार श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. श्री. मुश्रीफ यांचे प्रयत्न आणि पाठपुराव्यातून सुसज्ज व अद्ययावत उपनिबंधक कार्यालय इमारतीसाठी ९८ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
भाषणात आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, या कार्यालयाला अनेक वर्षापासून पुरेशी इमारत नसल्यामुळे नागरिकांना त्रास होत होता. प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयासाठीही सुसज्ज इमारत व्हावी व सर्वच शासकीय कार्यालय तिथे न्यावीत, हा माझा प्रयत्न होता. त्यासाठी जनावरांच्या दवाखान्याजवळ जागाही बघितलेली आहे. लवकरच पोलीस उपाधीक्षक कार्यालय व पोलीस स्टेशनची इमारत मंजूर करू.
यावेळी सतीश पाटील- गिजवणेकर, किरणअण्णा कदम, उदयराव जोशी, महेश सलवादे, गुंडेराव पाटील, रश्मीराज देसाई, सिद्धार्थ बन्ने, वसंतराव यमगेकर, सौ. शर्मिली पोतदार, सौ. रेश्मा कांबळे, श्रीमती शारदा आजरी, दीपक कुराडे, बाळासाहेब मिणचेकर, नेताजी पाटील, बंटी पाटील, संदीप कागवाडे, जावेद बुडेखान, प्रकाश पाटील, प्रकाश कांबळे, सुनील स्वामी, प्रसाद दड्डीकर, अशोक शिंदे, राकेश सासने, भरत शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत अमर मांगले यांनी केले. प्रास्ताविक सतीश पाटील- गिजवणेकर यांनी केले.
……………..
गडहिंग्लज : येथे उपनिबंधक कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करताना आमदार हसनसाहेब मुश्रीफ. यावेळी किरणअण्णा कदम, सतीश पाटील, उदयराव जोशी, नेताजी पाटील व इतर प्रमुख.