no images were found
ई टेंडर फायलिंग, जेईएन पोर्टल, वेंडर डेव्हलपमेंट कार्यशाळेचे आयोजन
कोल्हापूर : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत दोन दिवसीय ई टेंडर फायलिंग, जेईएम पोर्टल आणि वेंडर डेव्हलपमेंट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेमध्ये शासकीय ई टेंडर कसे भरावे, ई टेंडर कार्यपद्धती, टेंडर कसे वाचावे, टेंडरसाठी आवश्यक कागदपत्रे, शासकीय ई निविदा व सुट फायलिंग प्रोसेस, शासकीय ठेकेदार कसे बनावे तसेच डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र नोंदणी, माहिलांसाठी राखीव ई टेंडर, उपलब्ध शासकीय अनुदान याबाबत माहिती मिळेल. तसेच वेंडर नोंदणी, बी.ओ. क्यू प्रोसेस, जेईएम पोर्टलवर उद्योगाची नोंदणी व त्याचे फायदे, बिडिंग म्हणजे काय, ई रिव्हर्स ऑक्शन निविदा सुट नोंदणी, डी डी रिफंड व ऑनलाईन, ऑफलाईन पेमेंट इ. विषयी सविस्तर माहिती मिळेल.
कार्यशाळा उद्योजक, शेतकारी उत्पादक कंपनी, धान्य व्यापारी, बांधकाम ठेकेदार, इलेक्ट्रिक ठेकेदार मेडिकल व्यापारी, किराणा व्यापारी, महिला बचत गट, सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, सेवाभावी संस्था, मनुष्यबळ पुरवठा ठेकेदार, सॉफ्टवेअर, हार्डवेअर इंजिनिअर तसेच इतर इच्छुक व्यक्तींसाठी उपयुक्त आहे.
कार्यशाळेसाठी मर्यादित प्रवेश असल्यामुळे इच्छुकांनी अधिक माहितीसाठी वनिता पाटील, (प्रकल्प अधिकारी यांना ३१५, ई वॉर्ड न्यू शाहूपुरी, हॉटेल मराठा रिजन्सी समोर, कोल्हापुर येथे त्वरित संपर्क साधावा.