no images were found
नवाब मलिकांवर अॅ ट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिकांच्या विरोधात अॅंट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, असा आदेश वाशिम कोर्टाने पोलिसांना दिला आहे. एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडेंनी कोर्टात याचिका दाखल केली होती, यावर बुधवारी सुनावणी झाली. नवाब मलिक सध्या मनी लाँड्रिग प्रकरणी जेलमध्ये असतानाच त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
समीर वानखेडे यांच्या अनुसूचित जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेऊन, जातीवाचक टिप्पणी केल्याप्रकरणी वाशीम जिल्हा न्यायालयाने माजी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात अॅणट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. समीर वानखेडे यांचे चुलत भाऊ संजय वानखेडे यांनी वाशीम न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती. समीर वानखेडे यांनी स्वतः याचिका दाखल करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर समीर वानखेडे यांनी २४ ऑगस्ट २०२२ रोजी स्वतः वाशीम येथे येऊन याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने मलिक यांच्या विरोधात अॅयट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मलिक सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न केले जात असतानाच आता वाशीम जिल्हा न्यायालयाच्या या आदेशामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहे.