Home मनोरंजन आगामी “कापूसकोंडा” चित्रपटातून तब्बल २२ वर्षांनी सचिन पिळगांवकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र

आगामी “कापूसकोंडा” चित्रपटातून तब्बल २२ वर्षांनी सचिन पिळगांवकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र

11 second read
0
0
18

no images were found

 

आगामी “कापूसकोंडा” चित्रपटातून तब्बल २२ वर्षांनी सचिन पिळगांवकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र

 
चंदेरी दुनियेत ब्रेक मिळायला अनेक ऑडिशन्स द्याव्या लागतात. पण हा असा पहिला कलाकार आहे ज्याला ऑडिशन्स न देता थेट सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री  मधुराणी गोखले यांच्यासोबत चित्रपटात काम करण्याची लॉटरी लागली आहे ते पण हिरो म्हणून. कोण आहे हा हिरो ? या हिरोच नाव आहे “कापूसकोंडा”. हा एक गोंडस भुभु – कुत्रा आहे. आणि हेच या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे. आज अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर “कापूसकोंडा’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. “नवरा माझा नवसाचा” या गाजलेल्या चित्रपटात अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री मधुराणी गोखले दिसले होते. आता तब्बल २२ वर्षांनंतर “कापूसकोंडा” या आगामी चित्रपटातून पुन्हा एकदा एकत्र आले असून, बऱ्याच काळानंतर या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री मधुराणी गोखले चित्रपटात कमबॅक करत आहे.
 
जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा. लि. निर्मित “कापूसकोंडा” चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांचं आहे. सचिन मोहिते, गणेश पंडित, ऋषिकेश तुरई यांनी चित्रपटाची पटकथा, संवादलेखन केलं आहे. सचिन पाटेकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे सुमधुर संगीत या चित्रपटाला लाभले असून चित्रपटाच्या गाण्यांना गायक  अवधूत गुप्ते, पद्मनाभ गायकवाड यांचा स्वरसाज लाभला आहे. सुहास राणे यांनी ध्वनी तंत्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर व अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासह नवीन पिढीतील अभिनेत्री अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि अभिनेता भूषण पाटील अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण कथानकाची गरज समजून लातूर जिल्ह्यातील अंधोरी या गावी करण्यात आले आहे.
 
“कापूसकोंडा” चित्रपटाची कथा अत्यंत अनोखी आहे. विशेष म्हणजे चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर प्रेरित आहे.  चित्रपटाचा खरा हिरो हा पोस्टरवर दिसत असलेला एक ‘कुत्रा’ असून चित्रपटाचे रंजक कथानक हे  एका फॅमिली आणि त्या कुत्र्याच्या भोवती गुंफण्यात आले आहे. मानवी नाते संबंध, कुटुंब, भाव-भावनांवर आधारित ही हळवी गोष्ट प्रत्येकाला आपलीशी वाटणारी आहे. म्हणूनच या चित्रपटाला ए फॅमिली डॉग फिल्म अशी टॅग लाईन देण्यात आली आहे.  लेखक, दिग्दर्शक सचिन मोहिते या पुढे मराठीत पहिल्यांदाच  एक  ‘डॉगव्हर्स “करण्यास उत्सुक आहेत, कामही सुरु आहे.
 
या चित्रपटाचं कथानक हे अतिशय वेगळे आहे. इतक्या वर्षांच्या माझ्या कारकिर्दीत असे कथानक मी कधी केले  नाही. माझ्या भावनानसोबत या चित्रपटाचे कथानक मिळते जुळते असल्याचे मला जाणवले. त्याचप्रमाणे या चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक सचिन मोहिते हा मला पहिल्या भेटीतच कमालीचा हुशार वाटला आणि त्याच्यावर विश्वास ठेऊन मी या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला असे सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी सांगितले.
 
चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक सचिन मोहिते सरांनी चित्रपटाची कथा जेव्हा मला ऐकवली तेव्हाच मी या कथेच्या प्रेमात पडली. इतकी गोड, निरागस अशी ही कथा ऐकताना माझ्या मनाला भिडली सोबत वेगळी भूमिका करण्याची संधी मला मिळाली यासाठी मी या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. कथानक खुपच  वेगळ्या धाटणीचं असुनही अगदी सहजपणे मांडलं आहे. सोबत सचिन पिळगांवकर सरांसोबत काम करण्याची मला संधी २२ वर्षांनी मिळणार होती.सचिन सरांसोबत काम करताना अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या असे अभिनेत्री मधुराणी गोखले यांनी सांगितले.
 
उत्तम कथानकाला तितक्याच सक्षम अभिनयाची जोड असल्यानं हा चित्रपट मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे परंतु त्यासाठी अजून प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार असून लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे, तेव्हा भेटूया कापूसकोंड्याला लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

उद्योगस्नेही धोरणामुळे ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून महाराष्ट्राची ओळख-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्योगस्नेही धोरणामुळे ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून महाराष्ट्राची ओळख-मुख्यमंत्री देव…