no images were found
उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का, धनुष्यबाणासंदर्भात दिल्ली हायकोर्टानेही याचिका फेटाळली
नवी दिल्ली : आज शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे पक्षाचे चिन्ह गोठवण्याच्या भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्णयाविरोधात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आज पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे,
निवडणुक आयोगाने ८ ऑक्टोबर रोजी ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला “शिवसेना” किंवा चिन्ह “धनुष्यबाण” हे नाव आणि चिन्ह वापरू नये असे निर्देश दिले होते व पक्षातील दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्हे देण्यात आली होती. याचिका फेटाळताना, न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी मात्र दोन्ही पक्षांचे आणि जनतेचे हित लक्षात घेऊन प्रलंबित विवादाचा शक्य तितक्या लवकर निवाडा करण्याचे निर्देष ECI ला दिले आहेत. ठाकरे यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत आणि एकनाथ शिंदे यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील राजीव नायर आणि नीरज किशन कौल यांनी बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.