no images were found
पुष्पासाठी वकिलीचा परवाना हा केवळ कागदाचा तुकडा नाही, तर तिच्या ओळखीचं आणि आत्मसन्मानाचं प्रतीक आहे” — करुणा पांड
सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल आपल्या वास्तववादी कथाकथन आणि दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे. अलीकडच्या ट्रॅकमध्ये प्रेक्षकांनी पुष्पाच्या आयुष्यातील सर्वात हृदयद्रावक क्षण पाहिला — खोट्या लाचखोरीच्या आरोपानंतर तिचं वकीली परवाना निलंबित झालं आणि तिचं जग अक्षरशः कोसळलं.
हा प्रसंग कथानकातील एक मोठा टर्निंग पॉइंट ठरला, ज्यात पुष्पा तिच्या सर्वात असुरक्षित अवस्थेत दिसते — तिची ओळख हिरावली जाते, पण तरीही ती आपल्या मूल्यांवर ठाम राहते. हा भावनिक क्षण जिवंत करण्यासाठी करुणा पांडे यांनी स्वतःला पुष्पाच्या वेदनेत पूर्णपणे झोकून दिलं आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा अभिनय साकारला.
शूटिंगचा अनुभव सांगताना करुणा पांडे म्हणाल्या, “हा माझ्या या शोमधील सर्वात भावनिकदृष्ट्या थकवणारा सिक्वेन्स होता. पुष्पासाठी तिचा वकीली परवाना हा फक्त एक कागदाचा तुकडा नाही — तो तिची ओळख आहे, तिच्या आत्मसन्मानाचं प्रतीक आहे. तो अचानक हिरावला जाणं, तेही अन्यायकारक परिस्थितीत, खूपच धक्कादायक आहे. या सीनदरम्यान मला सतत त्या असहायतेच्या भावनेत राहावं लागलं, ज्यामुळे भावनिकदृष्ट्या खूप ताण आला. काही वेळा मला टेक्स दरम्यान थांबून स्वतःला सावरावं लागलं कारण भावना इतक्या खरी वाटत होत्या. पण अशा ट्रॅक्सच मला आठवण करून देतात की मला पुष्पा साकारायला का आवडतं — ती कोसळते, पण कधीच पूर्णपणे हार मानत नाही. तिची ही जिद्दच तिला प्रेरणादायी बनवते.”
पुष्पा आता स्वतःचं सत्य आणि सन्मान परत मिळवण्यासाठी लढा सुरू करते आहे, त्यामुळे पुढील भागांमध्ये आणखी भावनिक खोली आणि रोमहर्षक नाट्य पाहायला मिळणार आहे.