no images were found
स्कोडा ऑटो इंडियाची विक्रमी झेप — पहिल्या तिमाहीत आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंद
कोल्हापूर, : स्कोडा ऑटो इंडिया ने २०२६ सालातील पहिल्या तिमाहीत (जानेवारी–मार्च) उत्कृष्ट कामगिरी करत २०,०२८ युनिट्सची विक्री नोंदवली आहे. ही कंपनीच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक त्रैमासिक विक्री असून, मागील वर्षी याच कालावधीत झालेल्या १७,१३८ युनिट्सच्या तुलनेत तब्बल १७ टक्क्यांची वाढ दर्शवते.
२०२५ या विक्रमी वर्षानंतरही कंपनीने आपली वाढ कायम ठेवत नवे मानदंड प्रस्थापित केले आहेत. या यशामागे स्कोडा कायलाक या मॉडेलची सातत्यपूर्ण आणि मजबूत मागणी हे प्रमुख कारण ठरले असून, या मॉडेलने अलीकडेच ५०,००० विक्रीचा टप्पा पार केला आहे. याशिवाय स्कोडा कुश्क , स्कोडा स्लॅवि आणि प्रीमियम एसयूव्ही सेगमेंटमधील स्कोडा कोडिया्क यांच्या स्थिर कामगिरीमुळेही कंपनीच्या वाढीस चालना मिळाली आहे.
या कामगिरीबाबत बोलताना आशिष गुप्ता , ब्रँड संचालक, म्हणाले, “२०२६ मधील ही विक्रमी तिमाही आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आणि मजबूत धोरणाचे फलित आहे. २०२५ मधील यशानंतरही आम्ही वाढीचा वेग कायम ठेवत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. अधिक सुलभ आणि विविध प्रोडक्ट पोर्टफोलिओ, व्यापक बाजारपेठीय उपस्थिती आणि ग्राहक-केंद्रित उपक्रमांमुळे ही प्रगती शक्य झाली आहे.”
कंपनी ग्राहक अनुभव अधिक सक्षम करण्यावरही भर देत आहे. ‘स्कोडा सुपर केअर’ उपक्रमांतर्गत संपूर्ण मॉडेल रेंजवर ४ वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी, ४ वर्षांची रोडसाइड असिस्टन्स आणि ४ लेबर-फ्री सर्व्हिसेस दिल्या जात आहेत. या सुविधेमुळे ग्राहकांना अधिक विश्वास आणि मेंटेनन्स खर्चाबाबत निश्चितता मिळते.
सध्या १८० हून अधिक शहरांमध्ये ३३० पेक्षा जास्त कस्टमर टचपॉइंट्सच्या माध्यमातून स्कोडा ऑटो इंडिया आपली उपस्थिती वाढवत असून, स्थापन आणि उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांना सहज, पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा देण्यावर कंपनीचा भर आहे.