Home सामाजिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची पाहणी; १ मे महाराष्ट्र दिनी लोकार्पण

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची पाहणी; १ मे महाराष्ट्र दिनी लोकार्पण

8 second read
0
0
16

no images were found

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची पाहणी; १ मे महाराष्ट्र दिनी लोकार्पण

कोल्हापूर (प्रतिनिधी): लोकराजा राजर्षी शाहूंच्या कला प्रेमाचे प्रतीक असणारे संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या महा संकटानंतर पुन्हा एकदा त्याच पूर्वीप्रमाणे उभे राहील यासाठी तमाम रंगकर्मीच्या आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. रंगकर्मी, कलाकार या पवित्र ठिकाणी काम करणारा असून त्यांच्या सूचनांचा आदर ठेवून, त्यांना विश्वासात घ्या. जबाबदारीची जाणीव ठेवा, कोल्हापूरच्या अस्मिता असलेले या कामात कोणतीही त्रुटी राहता कामा नये, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार माननीय राजेश क्षीरसागर यांनी आज कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या.

       संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे कामाची पाहणी आ.राजेश क्षीरसागर यांनी केली.केशवराव नाट्यगृहात सुरुवातीला पुर्नबांधणीच्या कामाची त्यांनी पाहणी करून सूचनाही केल्या.आ.राजेश क्षीरसागर यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची दुर्घटना घडल्यानंतर एका आठवड्यातच घोषित केलेल्या निधीपैकी 25 कोटीचा निधी तात्काळ वर्ग करून तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी समाजाशी आपली असलेली समरसता आणि बांधिलकी कृतिशीलपणे व्यक्त केली आहे.केशवराव भोसले नाट्यगृह हे पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने आणि पूर्वी असेल त्याप्रमाणेच उभे राहील यासाठी आपण कटिबद्ध असून सर्व नाट्यकर्मीनीं यासाठी नियमित लक्ष देऊन वेळोवेळी सूचनाही केल्या आहेत. रंगकर्मींचा अनुभवाचा फायदा घेऊन नाट्यगृहाच्या कामास मूर्त स्वरूप द्या. वाढीव कामाच्या निधी मागणीचा प्रस्ताव ही तात्काळ शासनास सादर करावा. खासबाग मैदानातील झाडे तोडण्याऐवजी ते संवर्धन करण्याच्या दृष्टीने इतर उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या.

       ते पुढे म्हणाले की, कोल्हापूरच्या अस्मितेला साजेसे काम व्हावे ही सर्वांची भावना आहे. रंगकर्मींना अपेक्षित काम व्हावे त्या दृष्टीने त्यांच्या सूचनांवर योग्य अंमलबजावणी करून नियोजनबद्ध रीतीने काम सुरू असल्याने कामास थोडा कालावधी अपेक्षित आहे. पूर्वीप्रमाणे या ठिकाणी सुमारे 722 प्रेक्षक वर्गाची आसन क्षमता ठेवण्यात येणार आहे. यासह स्टेज साऊंड लाईट आधी अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करण्यात येणार आहे. सदर काम एक मे पर्यंत पूर्णत्वास येईल याची खात्री संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या महाराष्ट्र दिनी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा पार पडेल अशी खात्री आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
       यावेळी महानगरपालिका शहरअभियंता रमेश मस्कर, उपशहरअभियंता सुरेश पाटील, अनुराधा वांद्रे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रणजीत मंडलिक, सचिन पाटील, गणेश रांगणेकर, श्रीकांत मंडलिक, राहुल चव्हाण, आश्पाक आजरेकर आदी उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…