Home उद्योग एपीएसईझेडच्या कोलंबो टर्मिनल ने पहिल्याच वर्षात एक दशलक्ष कंटेनर्स हाताळले

एपीएसईझेडच्या कोलंबो टर्मिनल ने पहिल्याच वर्षात एक दशलक्ष कंटेनर्स हाताळले

14 second read
0
0
6

no images were found

एपीएसईझेडच्या कोलंबो टर्मिनल ने पहिल्याच वर्षात एक दशलक्ष कंटेनर्स हाताळले

      अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसईझेड) ने कोलंबो वेस्ट इंटरनॅशनल टर्मिनल (सीडब्ल्यूआयटी),कोलंबो येथे महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून, कार्यारंभाच्या पहिल्याच वर्षात एक दशलक्ष टीईयू (ट्वेंटी-फूट इक्विव्हॅलेंट युनिट्स) पेक्षा अधिक कंटेनर्स हाताळले आहेत. एप्रिल 2025 मध्ये सुरू झालेल्या या टर्मिनलने पोर्ट ऑफ कोलंबो मधील सर्वात वेगवान रॅम्प-अपचा विक्रम प्रस्थापित केला असून, एपीएसईझेड च्या वाढत्या जागतिक उपस्थितीचे आणि कार्यक्षमतेचे द्योतक आहे.

      अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, जॉन कील्स होल्डिंग्स पीएलसी आणि श्रीलंका पोर्ट्स अथॉरिटी यांच्या भागीदारीत विकसित झालेल्या या टर्मिनलमध्ये सुमारे 800 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे. उद्घाटन वर्षातच एवढ्या प्रमाणावर पोहोचणाऱ्या जगातील निवडक कंटेनर टर्मिनल्समध्ये सीडब्ल्यूआयटी चा समावेश झाला असून, जागतिक शिपिंग लाईन्ससोबतचे मजबूत समन्वय आणि कार्यक्षम ऑपरेशन्स याचे प्रतिबिंब यात दिसते.

       महत्त्वाच्या पूर्व-पश्चिम सागरी मार्गांवर धोरणात्मकदृष्ट्या स्थित असलेले कोलंबो हे शहर आशिया, मध्य पूर्व आणि युरोपला जोडणारे प्रमुख ट्रान्सशिपमेंट हब म्हणून आपले स्थान अधिक बळकट करत आहे. सीडब्ल्यूआयटी चे प्रारंभिक यश जागतिक व्यापार प्रवाहांमध्ये इंडियन ओशियन रिजन(आयओआर) चे वाढते महत्त्व अधोरेखित करते आणि ब्लू इकॉनॉमीमध्ये बंदर पायाभूत सुविधांची वाढती भूमिका दर्शवते.

      सीडब्ल्यूआयटी हे पोर्ट ऑफ कोलंबो मधील पहिले पूर्णतः स्वयंचलित डीप-वॉटर टर्मिनल असून,अत्याधुनिक अल्ट्रा-लार्ज कंटेनर जहाजे हाताळण्यासाठी तयार करण्यात आले आहे. 1,400 मीटर लांबीचा क्वे, सुमारे 20 मीटर पाण्याची खोली आणि अंदाजे 3.2 दशलक्ष टीईयू वार्षिक क्षमता यामुळे कोलंबोची माल हाताळणी क्षमता लक्षणीयरीत्या वाढते. आधुनिक डिजिटल प्रणाली, प्रगत क्रेन्स आणि इलेक्ट्रिफाइड यार्ड उपकरणांमुळे जलद टर्नअराउंड वेळ आणि अधिक कार्यक्षमता सुनिश्चित होते.हा टप्पा एपीएसईझेड ला भारतातील सर्वात मोठा खाजगी बंदर ऑपरेटर म्हणून अधिक बळकट करतो, ज्याच्या पोर्टफोलिओमध्ये भारतातील 15 आणि परदेशातील 4 बंदरे आहेत. जॉन कील्स होल्डिंग्स पीएलसी आणि श्रीलंका पोर्ट्स अथॉरिटी यांच्यासोबतचे सहकार्य जागतिक तज्ज्ञता आणि स्थानिक भागीदारीचे यशस्वी मिश्रण दर्शवते आणि सीडब्ल्यूआयटी ला विकसित होत असलेल्या जागतिक पुरवठा साखळीतील एक महत्त्वपूर्ण केंद्र बनवते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

हाराच्या सवयी आणि ताणतणाव वाढवणाऱ्या इच्छांवर नियंत्रण ठेवा – डॉ. करानी बी. संजीवी

आहाराच्या सवयी आणि ताणतणाव वाढवणाऱ्या इच्छांवर नियंत्रण ठेवा – डॉ. करानी बी. संजीवी …