Home Uncategorized मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’च्‍या सेटवर गीतांजली मिश्रा ऊर्फ नवीन राजेशचे उत्‍साहपूर्ण स्‍वागत

मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’च्‍या सेटवर गीतांजली मिश्रा ऊर्फ नवीन राजेशचे उत्‍साहपूर्ण स्‍वागत

1 min read
0
0
99

no images were found

मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन‘च्‍या सेटवर गीतांजली मिश्रा ऊर्फ नवीन राजेशचे उत्‍साहपूर्ण स्‍वागत

एण्‍ड टीव्‍हीवरील घरेलू कॉमेडी ‘हप्‍पू की उलटन पलटन‘मध्‍ये दरोगा हप्‍पू सिंगची (योगेश त्रिपाठी) दबंग दुल्‍हनिया नवीन राजेश सिंग ऊर्फ रज्‍जोच्‍या भूमिकेत गीतांजली मिश्राच्‍या प्रवेशाबाबत खूप उत्‍साह व उत्‍सुकता दिसते आहे. अभिनेत्री पहिल्‍यांदा शूटिंगसाठी आली असताना कलाकार व टीमने तिचे उत्‍साहपूर्ण स्‍वागत केले, त्‍यांचा उत्‍साह व्‍यक्‍त करत तिला शुभेच्‍छा दिल्‍या. याप्रसंगी केक कापण्‍यात आला आणि या सेलिब्रेशनच्‍या गोड आठवणी तयार झाल्‍या. असे उत्‍साहपूर्ण स्‍वागत आणि गीतांजलीच्‍या पदार्पणाबाबत सर्वत्र चर्चा सुरू असताना अभिनेत्री ७ ऑगस्टपासून नवीन राजेशच्‍या भूमिकेत पाहायला मिळेल तेव्‍हा ती निश्चितच प्रेक्षकांसाठी आनंददायी व मनोरंजनपूर्ण ट्रीट असेल. 

उत्‍साहपूर्ण स्‍वागत आणि एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन‘मध्‍ये नवीन राजेशच्‍या भूमिकेसंदर्भातील अपेक्षेबाबत गीतांजली मिश्रा म्‍हणाल्‍या, ”राधा राधे बोल लये है! मला हा अविश्‍वसनीय प्रवास सुरू करताना खूप आनंद होत आहे. सुरूवातीला मला प्रेक्षक मालिकेमधील माझ्या उपस्थितीला कशाप्रकारे प्रतिक्रिया देतील याबाबत चिंता वाटली, पण त्‍यांचे उत्‍स्‍फूर्त प्रेम व पाठिंब्‍याने माझ्यामध्‍ये आत्‍मविश्‍वास जागृत केला आहे. माझ्या टीमने केलेले उत्‍साहपूर्ण स्‍वागत व दाखवलेली आपुलकी पाहून मी भारावून गेले आहे. मला नवीन राजेशच्‍या भूमिकेत पाहण्‍यासाठी उत्‍सुक असलेल्‍या प्रेक्षकांच्‍या नजरेत उत्‍साह व उत्‍सुकता पाहण्‍याची भावना अविश्‍वसनीय आहे. ही संधी माझ्या जीवनातील सन्‍मान व महत्त्वाचा क्षण आहे. तुमच्‍या प्रोत्‍साहनासह मी तुम्‍हा सर्वांचे मनोरंजन करण्‍याचा आणि आनंद देण्‍याचा निर्धार केला आहे. एकत्र आपण हा प्रवास संस्‍मरणीय करू शकतो.”  

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …